शेतकरी हा नेहमी संकटात सापडलेल्या असतो जे की अत्ता कोरोनाच्या महामारीमुळे शेतकरी वर्गाचे खूप नुकसान झाले. तसेच आत्ता अतीवृष्टी मुळे काही भागात पूर आल्यामुळे शेतकऱ्यांची पिके मरून गेली. सध्याच्या स्थितीला पाहायला गेले तर शेतकरी पारंपरिक पिकाकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे.कारण पारंपरिक शेतीला जास्त खर्च सुद्धा जातो आणि उत्पादन कमी भेटते आणि कधी कधी त्यामधून तर लागवडीसाठी गेलेला खर्च सुद्धा निघत नाही त्यामुळे शेतकरी वर्ग चांगलाच संकटात असतो. त्यामुळे शेतकरी अत्ता आधुनिक पिकाकडे आपला कल ओळवत आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील लक्ष्मण काळे:
औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील लक्ष्मण काळे हे शेतकरी त्यांच्या शेतीमध्ये आधुनिक पीक घेऊन लाखो रुपयांचा फायदा करून घेत आहेत. त्यांनी त्यांच्या शेतीला आधुनिक तंत्रज्ञान जोडून आपल्या शेतीचा चांगला विकास केलेला आहे त्यांनी त्यांच्या शेतीमध्ये अद्रक पीक लावले आहे जे पीक एवढे चांगले आले आहे की इस्त्राईलच्या शेतीला सुद्धा मागे टाकेल.लक्ष्मण काळे यांनी अद्रक च्या शेतीमधून एवढा फायदा काढला आहे की तेथील परिसरातील शेतकऱ्यांपुढे एक वेगळाच आदर्श निर्माण करून ठेवला आहे.
लक्ष्मण काळे यांचे शिक्षण दहावी नापास आहे मात्र मनाची जिद्ध आणि आवड असल्यामुळे त्यांनी त्यांच्या शेतीमध्ये जो प्रयोग केला आहे तो यशस्वी ठरलेला आहे. काळे यांनी जवळपास १६ एकर शेती आहे. काळे यांनी जेव्हा शेती करण्यास सुरुवात केली त्यावेळी त्यांनी शेतीमध्ये पारंपरिक पीक घेतले होते मात्र त्यामधून त्यांना जास्त उत्पन्न भेटत न्हवते. यावर त्यांनी चांगला अभ्यास केला आणि आधुनिक पीक घेण्याचे ठरवले, त्यांनी त्यांच्या शेतीमध्ये अनेक वेगळे वेगळे प्रयोग करण्याचे ठरवले.
जेव्हा त्यांनी पहिल्यांदा अद्रक ची शेती करण्यास सुरू केले त्यावेळी त्यांनी १ एकर क्षेत्रात अद्रक ची लागवड केली त्यामधून त्यांना लाखो रुपयांचा फायदा झाला. सध्या पाहायला गेले तर त्यांनी त्यांचे ५ एकर शेती क्षेत्र अद्रक ने पिकवले आहे. प्रति एकर त्यांना १४० ते १८० क्विंटल अद्रक चे उत्पन्न भेटते यामधून ते लाखो रुपये कमवतात.लक्ष्मण काळे यांनी त्यांच्या शेतीचा एवढा अभ्यास केला आहे की कोणती औषधे कधी मारायची हे त्यांचे तोंडपाठ झाले आहे.सध्या ते घरी बसून अद्रक ची पावडर तयार करत आहेत हे सुद्धा प्रयोग त्यांचा यशस्वी झालेला आहे जे की तेथील ग्राहक वर्ग व व्यापारी वर्ग त्यांच्याकडून अद्रक पावडर घेऊन जातात यामधून सुद्धा त्यांना लाखो रुपये भेटतात.
Share your comments