सध्या शेतकरी वेगवेगळ्या प्रकारे शेतीमध्ये व्यवसाय करून पैसे कमवत आहेत. यामुळे त्यांना लाखोंचा फायदा देखील होत आहे. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील बाभूळगाव येथील शेतकऱ्यांनी शेतीला पूरक असा व्यवसाय म्हनून खेकडा पालन व्यवसाय चालु केला आहे. यामुळे त्यांच्या या वेगळ्या व्यवसायची पाहणी करण्यासाठी अनेकजण येत आहेत.
बाभुळगाव येथील शेतकरी भारत जहरव यांनी स्वता:च्या 20 बाय 50 आणि आठ फूट खोल शेतात शेततळे तयार करून त्यात खेकडा पालन व्यवसाय (Business) सुरू केला आहे. त्यांनी खेकडापालन व्यवसाय बद्दल माहिती त्यांनी youtube वरून घेतली आहे. भारत जहरव यांनी स्वतःच्या शेतामध्ये वीस बाय पन्नास आणि आठ फूट खोल शेततळे तयार केले आहे.
त्यांनी यामध्ये खेकडे पालन सुरू केलं आहे. तसेच या व्यवसायातून यावर्षी त्यांना सहा लाख रुपये उत्पादन देखील मिळाले आहे. यूट्यूबवर भरत यांनी खेकडा पालनाचा व्हिडीओ पहिला आणि पाहताच क्षणी हा उपक्रम आपणही राबवायचा ठरवले. त्यांना अनेक अडचणी देखील आल्या मात्र त्यांनी माघार न घेता काम सुरूच ठेवले.
या 5 पिकांची पेरणी नोव्हेंबरमध्येच करा! वेळेवर उत्पादन मिळेल, बंपर कमाई होईल
तसेच शेततळ्यात काही प्रमाणात माती टाकली, आणि त्यानंतर बीज रुपात 2 क्विंटल खेकडे या शेततळ्यात सोडण्यात आले. तसेच एक वर्ष हे खेकडे जोपासण्यात आले. चिकन आणि मासे यातील वेस्टेज या खेकड्यांना खायला दिले जाते. तसेच दर आठ दिवसाला शेत तळ्यातील पाणी बदलून काळजी घेतली जाते.
सुरुवातीला त्यांना देखील याबाबत काहीच माहिती नव्हती, मात्र त्यांनी माहिती करून घेतली. यातून 9 महिन्यात विक्रीलायक खेकडे तयार झाले आहेत. तसे जवळपास 12 क्विंटलहून अधिक खेकडे या शेततळ्यात विक्रीसाठी तयार आहेत. खेकड्याला आयुर्वेदिक महत्त्व मोठे असल्याने मागणी देखील जास्त आहे. सध्या 500 रुपये किलोप्रमाणे ह्या खेकड्याची विक्री होत आहे.
"वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटवर मोर्चा काढला पाहिजे, त्यांना काय संशोधन केलं ते विचारलं पाहिजे"
आतापर्यंत त्यांना खेकडा पालन उभारणी साठी जवळपास 4 लाख रुपये खर्च झाला आहे आणि यातून फक्त 9 महिन्यात 6 लाख रुपयांचे उत्पन्न झाले. तसेच अजुन देखील उत्पादनात वाढ होईल. यामुळे हा एक फायदेशीर व्यवसाय शेतकऱ्यांसाठी आहे. यामुळे शेतकऱ्यांनी वेगळे पर्याय शोधून व्यवसायाकडे वळाले पाहिजे.
महत्वाच्या बातम्या;
Soyabean Rate Today: आज सोयाबीनच्या भावात वाढ, जाणून घ्या आजचे दर
Raju Shetti: 'मुकादमांच्या फसवणुकीमुळं ऊस वाहतूकदार अडचणीत'
तुमच्याकडे 10 पैशांची ही नाणी आहेत का? एका मिनिटात मिळतील लाखो रुपये..
Share your comments