1. पशुसंवर्धन

शेतकऱ्यांनी करावेत पशुधना बरोबर हे दहा व्यवसाय, निश्चित होईल फायदा

KJ Maharashtra
KJ Maharashtra
bussiness idea

bussiness idea

 शेती व्यवसाय बरोबर अनेक जण पशुपालनाचा व्यवसाय करतात. शिवाय पशुपालनाचा व्यवसाय हा अधिक नफा देणारा व्यवसाय  आहे. ज्यांच्याकडे जनावरे आहेत त्यांच्याकडे लक्ष्मी नांदते यात शंका नाही. या लेखात आपण पशुपालन हा बरोबर आणखी काही शेतीशी निगडित व्यवसाय बघणार आहोत त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. तर जाणून घेऊ या व्यवसायिक आयडिया.

 पशुधन व्यवसायाच्या मुख्य कल्पना

  • पोल्ट्री फार्मिंग: सध्या कोरोनामुळे आपल्याला या व्यवसायात नुकसान दिसत असेल पण पोल्ट्री असा व्यवसाय आहे ज्यातून आपल्याला मोठा नफा मिळत असतो. यासाठी आपण योग्य चांगल्या गुणवत्ताधारक कंपनीशी करार करावा त्यांच्याकडील पील्ले घ्यावी. पोल्ट्री मधून आपण चिकन आणि अंड्यामधून पैसा कमवू शकता. मांसाची मागणी खूप आहे. आपण कमीत कमी प्रमाणात व्यवसाय सुरू करू शकतो.
  • शेळीपालन: शेळ्यांपासून आपण मांस आणि दूध मिळवत असतो. पशुपालन करणाऱ्यांना माहिती आहे की शेळीपालनात किती फायदा असतो. शेळी पालनासाठी खर्च फार कमी येत असते. मात्र नफा हा मोठा मिळत असतो. शिवाय हा व्यवसाय तुम्ही कमी जागेतही सुरू करू शकता.
  • डेअरी व्यवसाय:हा दुसऱ्या क्रमांकाचा अधिक उत्पन्न देणारा व्यवसाय आहे.फक्त दूध विक्री नव्हे तर दुधा पासून बनवण्यात येणारे पदार्थ तयार करून आपण पैसा कमावू शकतो.
  • मत्स्यशेती : हा एक चांगला पर्याय आहे. जर आपल्याकडे शेततळे असेल तर आपण मत्स्यशेती करून पैसा कमवू शकतो. या तळ्यात आपण विविध जातीचे मत्स्यबीज टाकून उत्पन्न घेऊ शकतो. मासे पालन व्यवसाय सुरू करताना, स्थानिक मागणी समजून घेण्यासाठी बाजारपेठ  अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. आज-काल सजावटीच्या मासेपालन देखील लोकप्रिय होत आहे.
  • वराह पालन शेती: काही वर्षापासून वराह पालन शेती लोकप्रिय झालेली असून अंदाजानुसार दर वर्षी जगभरात एक अब्ज डुकरांची कत्तल केली जाते. सर्वाधिक वराहाची  निर्यात करणाऱ्या देशांमध्ये युरोपियन संघ, यूएस आणि कॅनडा यांचा समावेश होतो. आपण वराहपालन म्हटलं की याचा उपयोग  मांस साठी केला जातो असेच समजत असतो परंतु मांस व्यतिरिक्त वराहाची चरबी, त्वचा आणि इतर साहित्य कपडे, सौंदर्यप्रसाधने, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ आणि वैद्यकीय औषधांसाठी वापरली जातात.
  • खेकडा पालन: भारत, बांगलादेश आणि थायलंड सह आशियाई देशांमध्ये  चिखल खेकडे चिखलात राहणार खेकडे लोकप्रिय आहेत. या देशामध्ये मोठ्या प्रमाणात या खेकड्यांचे उत्पादन घेतले जाते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये या खेकड्यांना खूप मागणी आहे. फार कमी खर्चात आपण या खेकड्याची शेती सुरू करू शकतात.
  • बटेर पक्षीपालन: हा एक जंगली पक्षी आहे परंतु मांसाहार खाणाऱ्यांसाठी हा आवडीचा पक्षी आहे. बटेर पक्ष्याचे मांस रुचकर व स्वादिष्ट असते. त्यामुळे त्याची मागणी अधिक आहे. या पक्षाचे किंमत ही 55 ते 60 रुपये असते. या पक्षाचे अंडे ही विकली जातात.
  • मोतीची शेती: मोतीच्या शेतीला सध्याच्या घडीला फार महत्व आहे. आपण आता कृत्रिमरित्या बनवू शकतो. परंतु या व्यवसायासाठी दीर्घकालीन योजना आखावी लागते.
  • मेंढी पालन: पशुधन शेतीतील हा उत्तम पर्याय आहे. कमी पैशात अधिक उत्पन्न मिळवण्याचा एक मार्ग आहे. परंतु मेंढी पालन करताना एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते ती म्हणजे  मेंढीची योग्य जात ओळखून आपण त्यांची निवड केली पाहिजे. आपल्याकडील वातावरणात कोणत्या मेंढ्या  या योग्य असतात त्यानुसार आपण मेंढ्या खरेदी केल्या पाहिजेत. भारत, चीन, ऑस्ट्रेलिया आणि इराण मध्ये मेंढ्यांचे मोठे उत्पादन होत असते. मेंढ्या पासून आपल्याला दूध, मांस आणि लोकर मिळत असते.
  • बदक पालन शेती: जर आपण कमी किंमतीत पशुधन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करीत असाल तर आपण बदक पालना विषयी विचार करू शकता. योग्यरीत्या केले तर बदक शेती मधूनही आपण मुबलक पैसे कमवू शकतो. जगभरात याची शेती होत असते.  बदकाचे मांस, अंडी पासून आपण पैसे कमावू शकतात. पाण्याशिवाय सुद्धा वाढवता येतात. याव्यतिरिक्त बदके हे मजबूत पक्षी  आहेत. त्यांना अतिरिक्त काळजी आणि व्यवस्थापनाची आवश्‍यकता नाही.

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters