कष्ट, खडतर प्रयत्न आणि प्रचंड जिद्द ठेवली तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही. हे वाक्य आपण बऱ्याच ठिकाणी ऐकतो आणि वाचतो. परंतु जेव्हा एखादी गोष्ट या वाक्याला साजेशी घडते तेव्हा ऊर अभिमानाने भरून येतो अशीच एक साजेशी आणि अभिमानास्पद कामगिरी एका शेतकरी कन्याने करून दाखवली आहे. त्याबद्दल या लेखात आपण माहिती घेऊ.
मूळच्या आष्टी तालुक्यातील असलेल्या प्रतिभा सांगळे ह्याबीड पोलीस दलामध्ये 2010 पासून पोलीस मुख्यालयात महिला कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. प्रतिभा सांगळे या शेतकरी कुटुंबातून येतात. त्यांनी अगोदर कठोर मेहनत करून पोलीस दलात नोकरी मिळवली आणि तेवढ्या वरनथांबता जिद्द आणि चिकाटीने मिस महाराष्ट्राचा ताज पटकावला आहे.
प्रतिभा सांगळे ह्या चांगल्या कुस्तीपटू देखील आहेत.त्यांनी त्यांच्या आजोबांपासून प्रेरणा घेऊन कुस्तीचे मैदान गाजवले आहे.जेव्हा त्या शालेय जीवनामध्ये होत्या तेव्हा अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये सहभाग नोंदविला आहे. पोलीस दलामध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी सौंदर्य स्पर्धेत देखील सहभाग नोंदवला.एक उत्तम कुस्तीपटू, पोलीस दलातील उत्तम सेवा आणि आता मीस महाराष्ट्र असे यश मिळताच त्यांच्यावर पोलीस दलास संपूर्ण जिल्ह्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
प्रतिभा सांगळे यांनी डिसेंबर 2021 मध्ये पुण्यात मीसमहाराष्ट्र स्पर्धा आहे अशी त्यांना माहिती मिळाल्यानंतर ही स्पर्धा जिंकायचिसअशी खूणगाठ मनाशी बांधून प्रचंड मेहनत घेणे सुरू केले आणि विशेष म्हणजे ही स्पर्धा त्यांनी जिंकली त्यांच्या या कामगिरीने ग्रामीण भागातील अनेक तरुणांसमोर प्रेरणादायी असा आदर्श घालून दिला आहे.(संदर्भ-लोकमत)
Share your comments