जगभर थैमान घातलेल्या कोरोना नावाच्या विषाणूमुळे अनेक लोकांचे नुकसान आणि त्याबरोबर अतोनात हाल सुद्धा झाले आहेत. या काळात अनेक छोटे मोठे व्यवसाय बंद पडले आहेत सोबतच असंख्य शिक्षित युवा सुद्धा बेरोजगार झाले आहेत.कोरोना विषाणू मुळे सर्वत्र महागाई सुद्धा वाढली आहे. सोबतच उच्च शिक्षित तरुणांनी नोकरीची अनिश्चितता आहे म्हणून सरळ आपली पाऊले शेळीपालन आणि कुक्कुटपालन या कडे वळवली आहेत.
औरंगाबादमधील असणारे इंजिनियर आणि व्यवस्थापन या उच्च पदव्या घेऊन सुद्धा हे तरुण आता कुक्कुटपालन आणि शेळी पालन यासारखे पर्याय स्वीकारत आहेत. यामागिल कारण म्हणजे बेरोजगारी आणि नोकरीची अनिश्चितता.औरंगाबाद कृषी विज्ञान केंद्र केव्हीके येथे कुक्कुटपालन आणि शेळीपालन अभ्यासक्रमात असणारे तज्ज्ञ डॉ. अनिता जिंतूरकर यांनी पीटीआयला असे सांगितले की, आपल्या जीवनात व्यावसायिक स्थिरता असावी यासाठी चक्क 20 इंजिनियर व व्यवस्थापन(MBA) या उच्च पदवीधारकांनी कुक्कुटपालन पालन आणि शेळीपालन या अभ्यासक्रमाला आपली नाव नोंदणी केली आहे.
हेही वाचा:खर्च, जोखीम कमी करणारे नागरे यांचे तीन मजली शेती तंत्र; जाणून नवीन शेतीची पद्धत
उच्च शिक्षित पिढीचा शेळीपालनाकडे कल:
वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ (परभणी) अंतर्गत घेतल्या जाणार्या शेती संलग्न म्हणजेच शेळीपालन अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाते. डॉ. जिंतूरकर म्हणाल्या की, त्यांच्याकडे या अभ्यासक्रमासाठी आतापर्यंत कुक्कुटपालन व शेळी पालन अभ्यासक्रमासाठी 20 पेक्षा जास्त अर्ज आले असून लवकरच हा शेतीसलग्न व्यवसाय असलेला अभ्यासक्रम लवकरच ऑनलाईन पद्धतीने सुरू होईल.या 20 अर्जा पैकी या मध्ये 15 इंजिनियर आणि 2 MBA या उच्च शिक्षणात पदव्या मिळवलेला विद्यार्थी वर्गाचा समावेश आहे.
बांधकाम व्यवसायाचा इंजिनिर क्षेत्रात डिप्लोमा केलेले श्री पवन पवार म्हटले की आमच्याकडे शेतजमीन आहे परंतु शेतीत काम करायला कोणी माणूस नाही. नोकरी करताना आपण आपल्या पगाराची महिना एन्ड ला वाट बघतच असतो. त्यामुळं असे वाटते की स्वतःच्या रानात कष्ट करून आणि मेहनत करून शेळीपालन आणि कुक्कुटपालन करून नोकरी पेक्षा अधिक पैसे कमवू शकतो असे म्हटले आहे. गेवराई तांडा या छोट्याश्या खेडेगावात राहणारे इंजिनियर कृष्णा राठोड यांनी सांगितले की कोरोनाच्या काळात लॉकडाऊन मध्ये माझ्या कंपनीने मला राजीनामा द्यायला सांगितले होते. यामुळे नोकरीची हमी न्हवती. त्यामुळं त्यांनी कंपनीत राजीनामा देऊन कुक्कुटपालनाबद्दल आणि शेळीपालन बद्दल शिकण्याचा ध्यास घेतला. यातून मी नोकरीपेक्षा जास्त पैसे कमवू शकतो असे म्हटले आहे.
Share your comments