1. यशोगाथा

राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या यंत्राच्या साह्याने केली कांदा लागवड,वाचवले एकरी आठ हजार रुपये

नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा लागवड फार मोठ्या प्रमाणात केली जाते.नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव,देवळाआणिइतर तालुक्यांमध्ये कांद्याचे लागवड मोठ्या प्रमाणात होते.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
onion crop

onion crop

नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा लागवड फार मोठ्या प्रमाणात केली जाते.नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव,देवळा आणि इतर तालुक्यांमध्ये कांद्याचे लागवड मोठ्या प्रमाणात होते.

कांदा लागवड म्हटले म्हणजे लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात मजुरांची आवश्यकता भासते. परंतु मजुरांची टंचाई मोठ्या प्रमाणावर भासत असल्याने आणि लागवडीचा हंगाम हा सगळे शेतकऱ्यांचा एकाच वेळी आल्याने मजुरांची समस्या फार मोठ्या प्रमाणातउद्भवते.

कांद्याची लागवड हीडिसेंबर आणि जानेवारी महिन्याच्या पंधरवड्यात करणे फायद्याचे असते. त्यामुळे या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली जाते. आधीच मजुरांची समस्या तसेच वाढलेले मजुरीचे दर यामुळे आधीच शेतकरी त्रस्त असताना पैसे देऊनही मजूर वेळेवर मिळत नाही.

त्यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होते. हीच अडचण लक्षात घेऊन एकलहरे येथील शेतकरी भूषण पगार यांनी राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेले यंत्र आणले आहे. या यंत्राचा वापर करून कांद्याचे लागवड ट्रॅक्‍टरच्या साह्याने व कमीत कमी मजूर यांच्या उपस्थितीत करणे शक्य झाले आहे. या यंत्राच्या साह्याने कांदा चे शेती तयार करण्यापासून तर लागवड करण्यापर्यंत इत्यादी कामे करता येतात.त्यामुळे कांदा लागवड वेळेमध्ये तर बचत होतेच तसेच वाढीव मजूर खर्चावर देखील बचत होते त्यामुळे शेतकऱ्यांचे जवळजवळ 70 टक्‍क्‍यांपर्यंत खर्च वाचतो. त्यामुळे हा प्रयोग चांगला यशस्वी होत असून येणाऱ्या वर्षांमध्ये कांदा लागवडीसाठी या यंत्राचा मोठ्याप्रमाणात वापर केला जाईल असं दिसते.

 या यंत्राची वैशिष्ट्ये

  • एक ट्रॅक्‍टर व एक यंत्राच्या साह्याने व दहा मजूर घेवून दिवसभरात दोन एकर कांद्याची लागवड करता येते.
  • एका एकर साठी फक्त चार हजार रुपये खर्च येतो. मजुरांद्वारे लागवडीचा विचार केला तर एकरी 10 ते 12 हजार रुपये खर्च येतो. म्हणजे जवळजवळ सात ते आठ हजार रुपयांची बचत होते.
  • शेतात तयार करण्यासाठीसुद्धा याचा उपयोग होतो.
  • कमीत कमी खर्चात व कमी वेळात जास्त क्षेत्रावर लागवड शक्‍य
  • यंत्रामुळे लागवड केल्याने वाफे बांधण्याचा खर्च आणि वेळ यांच्यामध्ये 70 टक्‍क्‍यांपर्यंत बचत होते.(संदर्भ-दिव्यमराठी)
English Summary: do onion cultivation with machine that develope by rahuri krushi vidyapith and save money and time Published on: 17 January 2022, 12:00 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters