शेती (farming) करताना शेतकरी पिकांबरोबर फळ बागांची सुद्धा लागवड करत असतात. फलबागांमध्ये पेरू, आंबा, चिक्कू, सीताफळ आणि नारळ या फळ बागांचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात असते.मध्य प्रदेश राज्याची राजधानी असलेल्या भोपाळ मधील एका शेतकऱ्याने चक्क पेरू लागवडी मधून तब्बल 32 लाख रुपये मिळवले आहेत. संपूर्ण मध्यप्रदेश राज्यात प्रसिद्ध पेरू उत्पादक शेतकरी म्हणून दिनेश बागड यांची ओळख सर्वत्र प्रस्थापित झालेली आहे.जेव्हा तुम्ही दिनेश बागड यांच्या बागेला भेट द्यायला जाल तेव्हा बागेत तुम्हाला वेगवेगळ्या आकाराचे पेरू झाडाला लटकलेले पाहायला मिळतील. परंतु या सर्व यशामागे त्यांचे मोठ्या प्रमाणात असलेले काबाडकष्ट सुद्धा आहे.
मित्राने फळबाग लावण्याचा सल्ला दिला:
दिनेश सांगतात एक काळ असा ही होता जेव्हा साजोद-राजोद या गावात राहणाऱ्या दिनेश नेे आपल्या 4 एकर वडिलोपार्जित जमिनीवर परंपरेने मिरची, टोमॅटो, भेंडी, करडई आणि इतर वेगवेगळ्या प्रकारच्या हंगामी भाज्या पिकवल्या होत्या. परंतु , वाढते काबाडकष्ट, खर्च तसेच कीड, बुरशी आणि रोगराई च्या प्रचंड प्रादुर्भावमिळणार नफा हा त्यातच जायचा त्यामुळे त्याच उत्पन्न शून्य झाले होते. शेतात घातलेला खर्च सुद्धा त्यातून निघत नसल्यामुळे दिनेश वैतागून जात होता. म्हणूनच दिनेश ने नंतर पारंपारिक शेती करण्याचे सोडून दिले आहे त्याच 4 एकर क्षेत्रात पेरू ची लागवड केली.2010 साली दिनेश बागड यांना त्यांच्या मित्राने फळबाग लावण्याचा सल्ला दिला होता.आणि त्याच मित्राने त्यांना थाई या वाणाच्या पेरू ची परिपूर्ण पणे माहिती दिली.द बेटर इंडिया या वेबसाईटवर दिनेश यांनी सांगितले की अन्य पेरू च्या तुलनेत हा पेरू मोठा आहे आणि या पेरू चे वजन हे 300 किलोग्राम एवढे भरत आहे.
पेरूच्या या वानाला व्हीएनआर -1 असे म्हटले जाते. या जातीचा पेरू झाडापासून तोडल्यानंतर चक्क सहा दिवसांपर्यंत चांगला राहू शकतो. या कारणामुळे दूरवर असलेल्या बाजारपेठांमध्ये याची विक्री करणे शक्य होते.सध्या दिनेश बागड यांच्या 4 एकर क्षेत्रात त्यांनी पेरू ची लागवड केली आहे. एकूण क्षेत्रात 4 हजार पेरूची झाडे आहेत. आणि त्या 4000 झाडांपासून त्यांना 32 लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.त्यांच्या यशानंतर मध्य प्रदेशातील चक्क 400 हुन अधिक शेतकऱ्यांनी पेरू ची लागवड केली आहे. सुरवातीच्या काळात दिनेश ला पेरू चा आकार पाहून वेगवेगळ्या शंका मनात येत होत्या. म्हणजेच रासायनिक खते वगैरे.परंतु 11 महिन्यात त्यांच्या शंका चुकीच्या ठरल्या आणि त्यांच्या बागेत सर्वात मोठ्या फळाचे वजन 1.2 किलो असलेले पाहायला मिळाले. त्यानंतर काही दिवसांनी हळू हळू करत 10 वर्षात भावाच्या मदतीने 4000 पेरू ची झाडे लावली. त्यासाठी त्यांनी 18 एकर जमीन ही भाडेतत्वावर सुदधा घेतली आहे. गेल्या काही वर्षांत त्यांच्या उत्पन्नात पाचपट वाढ झालेली आहे.
पेरूच्या(guava) रोपांची देखभाल करण्यासाठी जास्त खर्च येत नाही किंवा जास्त औषध सुद्धा लागत नाही. केवळ या रोपांची योग्य काळजी घेणे खूप गरजेचे असते. सुरवातीला मोठ्या आकाराचे पेरू विकण्यासाठी त्यांना अनेक प्रकारच्या अडचणी आल्या त्यानंतर त्यांनी भीलवाडा, जयपूर, उदयपूर, अहमदाबाद, वडोदरा, सुरत, पुणे, मुंबई, बेंगळुरू, भोपाळ, दिल्ली या देशातील विविध कोपऱ्यात जाऊन पेरू विकू लागले.2016 सालामध्ये दिनेश यांनी मुंबईत पेरू हा 185 रुपये किलो या भावाने विकले आहेत. दिल्ली आणि मुंबईतील ग्राहकांनी त्यांच्या या पेरुचे कौतुक केले.वाढत्या प्रोत्साहाने त्यांनी या वर्षी अजून 5 एकर जमीनित पेरू लागवड करणार आहेत असे सांगितले आहे.
Share your comments