1. यशोगाथा

नाशिक जिल्ह्यातील वडनेर भैरव येथील कन्येच्या अर्थपूर्ण ब्रँड ने दिला अर्थपूर्ण खाण्याचा संदेश

सध्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर केला जातो.उत्पादनात वाढ व्हावी आणि पिकांवर पडणारे रोग आणि किडींचा बंदोबस्त करण्यासाठी कीटकनाशकांचा वापर शेतकरी मोठ्या प्रमाणात करतात. परंतु या कीटकनाशकांच्या वापरामुळेत्याचे अंश भाजीपाला च्या द्वारे मानवी शरीरात जाऊन त्याचे आरोग्यावर घातक परिणाम होतात.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
ragi laadu

ragi laadu

 सध्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर केला जातो.उत्पादनात वाढ व्हावी आणि पिकांवर पडणारे रोग आणि किडींचा बंदोबस्त करण्यासाठी कीटकनाशकांचा वापर शेतकरी मोठ्या प्रमाणात करतात. परंतु या कीटकनाशकांच्या वापरामुळेत्याचे अंश भाजीपाला च्या द्वारे मानवी शरीरात जाऊन त्याचे आरोग्यावर घातक परिणाम होतात.

तसेच परंपरागत पिकांमध्ये बाजरी,ज्वारी आणि नाचणी यासारखे धान्याचे खाण्याचे  प्रमाण बर्‍याच प्रमाणात कमी झाली आहे. याच पार्श्वभूमीवर शेतात काम करायचे व स्वतःचे अन्न स्वतः पिकवायची हा संस्कार मनाशी बाळगून नाशिक जिल्ह्यातील वडनेर भैरव येथील कन्या सुचेता भंडारेयांनी मातीशीकनेक्ट राहुन काहीतरी करता येईल या दृष्टीने विचार केला व सुरु झाला पुढचा प्रवास. या लेखात आपण सुचेता भंडारी यांचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेणार आहोत.

 सुचेता यांचा अर्थपूर्ण ब्रँड

 लोकांना खाण्यासाठी काहीतरी पौष्टिक, नैसर्गिक पदार्थ उपलब्ध करून देणे या उद्देशाने सुचेता भंडारे यांनी अर्थपूर्ण नावाची एक कंपनी सुरू केली. यासाठी त्यांनी अगोदर शेतकऱ्यांना  नाचणीचे पीक घ्यायला उद्युक्त केले व त्या माध्यमातून नाचणीचे पौष्टिक लाडू बनवायला सुरुवात केली. या नाचणीच्या लाडवांना त्यांनी अर्थपूर्ण हे नाव दिले.

काही कालावधीतच त्यांच्या नाचणीच्या लाडवांचा ब्रँड उभा केला काही खाण्यापेक्षा काहीतरी अर्थपूर्ण खाहा संदेश देण्यात सुचेता यशस्वी ठरल्याआहेत. याविषयी बोलताना त्या सांगतात की, आजकाललोकांना पारंपारिक पद्धतीने रेसिपीज बनवायला हवा तेवढा वेळ नसतो. परंतु या पौष्टिक रेसिपी पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत व त्या टिकल्या पाहिजेत या उद्देशाने मी नाचणीचे लाडू बनवायला सुरुवात केली. यासाठी त्यांनी 2019 मध्ये अर्थपूर्ण नावाची कंपनी स्थापन केली व तिचे नोंदणी करून 2020 पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. याद्वारे त्यात चार प्रकारच्या नाचणीचे लाडू बनवतात. साधे गुळाचे, खजुराचे,विगनचेआणि मिश्रडाळींचे. विशेष म्हणजे हे लाडू दीड महिने टिकतात. हे लाडू बनवताना ते हेल्थ आणि हायजिन स्टॅंडर्ड टिकवण्याचा कसोशीने प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे नाचणीच्या लाडवांच्या प्रत्येक बॅचेस लॅबमध्ये सॅम्पल टेस्ट होते.सुचेता  सांगतात की मी बी. एडकेले असल्याने पुढे शिक्षण क्षेत्रात काम करावे असे घरच्यांना वाटत होते. परंतु आई-वडिलांना शेतात काम करताना पाहून शेतीशी कनेक्ट व्हायचा निर्धार पक्का व्हायचा. त्यातुनच अर्थपूर्ण चे बीज माझ्या मनात रोवले गेले.

यासाठी उभारले शेतकऱ्यांची नेटवर्क

 अर्थपूर्ण ब्रँड साठी सुचेता काही शेतकऱ्यांकडून नाचणी विकत घेतात.यासाठी त्यांनी पुण्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना हे पीक घेण्यासाठी उद्युक्त केले आहे. पूर्णपणे सेंद्रिय  पद्धतीने नाचणीची शेती केली जाते. सुचेता या शेतकऱ्यांकडून थेटनाचणी विकत घेतात व त्यांना योग्य मोबदला देतात. अगोदर शेतकरी हे पीक घ्यायला उत्सुक नव्हते परंतु त्यांना समजावल्यानंतर त्यांचे मन वळवण्यासत्या यशस्वी ठरल्या. आज नाचणी पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची नेटवर्क तयार केलंय.

 सुचेता यांच्या उद्योगाचे स्वरूप

 सध्या त्यांच्या अर्थपूर्ण कंपनीमध्ये सात महिला कामाला असून त्यांच्या माध्यमातून दर महिन्याला नाचणीचे साधारण दोनशे किलो लाडू तयार केले जातात. 

हे तयार लाडू ते  मुंबई, पुणे,दिल्ली, कर्नाटक यासारख्या ठिकाणी पाठवतात कारण येथे या लाडवांना चांगली मागणी आहे. त्यांच्या या लाडवांची पॅकिंग वैशिष्ट्यपूर्ण असून पुठ्याच्या बॉक्समध्ये हे पॅकिंग केले जाते. त्यांनी ज्वारीच्या लाह्या यांचा चिवडा हे आणखी एक हेल्दी प्रोडक्ट सुरू केले असून जर तुम्हाला या अर्थपूर्ण लाडवांची ऑर्डर द्यायची असेल तर अर्थपूर्ण या इंस्टाग्राम पेज वरून तुम्ही देऊ शकतात.(स्त्रोत-सामना )

English Summary: daughter of nashik district sucheta bhandare establish arthpurn brand of laddu Published on: 14 February 2022, 10:18 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters