यशाची शिखरे पार करण्यासाठी असंख्य अडचणींचा डोंगर पार करावा लागतो. आणि अशा संघर्षमय कथा आजवर तुम्ही ऐकल्या असतील, त्याची प्रत्यक्ष अनुभूतीसुद्धा घेतली असेल, शिवाय आपल्या आजूबाजूला अशी कितीतरी उदाहरणे आहेत. तर अशीच चकित करणारी संघर्षमय कथा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आपल्या वडिलांचे कष्ट पाहून UPSC परीक्षेत 201 वा क्रमांक मिळवून IAS अधिकारी झालेल्या व्यक्तीचा प्रवास आज जाणून घेणार आहोत.
श्रीमाधोपूर, सीकर येथे राहणारे बनवारीलाल निथरवाल यांचा मुलगा सोहनलाल निथरवाल यांच्या संघर्षाचा प्रवास सगळ्यांसाठी प्रेरणा देणारा असाच आहे.वडील धान्य मार्केटमध्ये मजुरी करणारे आहेत. बनवारीलाल निथरवाल हे भुडीच्या धानी ढलयावाड्यात शेती करणारे एक अत्यंत साधेसुधे व्यक्ती आहेत.मात्र आपल्या मुलाने आपल्यासारखे आयुष्य जगू नये यासाठी ते बरेच कष्ट घेत होते. आणि त्यांच्या कष्टाचे त्यांच्या मुलाने चीज केलेच. मुलगा सोहनलाल निथरवाल याचे उच्च शिक्षणाचे स्वप्न होते आणि यासाठी त्यांनी स्वतः कष्ट सोसून त्यांनी मुलाचे उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण केले.
सोहनलाल यांनी यूपीएससी परीक्षेत 201 वा क्रमांक मिळवला होता. तो प्रवास पण सोपा नव्हता. त्यांनी त्यांच्या गावातील सरकारी शाळेतून शिक्षणाला सुरुवात केली. गावातील शाळेत दहावीपर्यंत शिक्षण घेतले आणि त्यानंतर सीकरला जाऊन विज्ञान विषय घेऊन बारावीचे शिक्षण पूर्ण केले त्यानंतर 2016 मध्ये त्यांनी आयआयटी दिल्लीतून इलेक्ट्रिकमध्ये बीटेक पूर्ण केले. यानंतर मेहनतीच्या जोरावर 2018 साली त्यांनी इंजिनीअरिंग सुरू केली. या दरम्यान, 2019 मध्ये त्याच्या सततच्या प्रयत्नांमुळे, त्याने तिसऱ्या प्रयत्नात 201 व्या क्रमांकावरून UPSC परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण केली.
सध्या IAS सोहनलाल यांची राजस्थान केडरमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. मोठ्या पदावर नियुक्ती झाली असली तरी मातीची नाळ तुटली नाही. शिवाय आपल्या घरच्यांनी केलेल्या मेहनतीला विसरले नाहीत. सोहनलाल हे एक IAS अधिकारी असूनदेखील गावी गेल्यावर आपल्या वडिलांच्या कामात हातभार लावतात. ते त्यांच्या वडिलांना शेतीच्या कामात मदत करतात.
त्यांच्या कार्यामुळे त्यांची बरीच चर्चा होत आहे. सध्या आयएएस सोहनलाल हे आजच्या तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत. ते जोधपूर जिल्ह्यात प्रशिक्षणार्थी सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त आहेत.
महत्वाच्या बातम्या:
आनंदाची बातमी : आमिर खान यांनी 'सत्यमेव जयते फार्मर कप' ची केली घोषणा; शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा
Mango Fruit: आंबा फळपिकाला सोनेरी दिवस! आता घेता येणार मनसोक्त आस्वाद
Share your comments