आपण अनेकदा सासू-सुनेच्या वादाच्या बातम्या बघितल्या असतील पण आज आपण सासू-सुनेने अपार कष्टाने मिळवलेल्या यशा विषयी जाणून घेणार आहोत. हरियाणा राज्यातील सासू-सुनेने शेती क्षेत्रात नावीन्यपूर्ण कामगिरी करत अभूतपूर्व यश मिळवले आहे. या सासू-सुनेच्या जोडीने लसणाच्या शेतीत बंपर उत्पादन घेऊन शेतीचा अर्थच बदलून टाकला आहे.
फतेहाबाद जिल्ह्यातील भुतानखुर्द गावातील अनिता जाखड यांनी त्यांच्या 60 वर्षीय सासू चमेली देवी यांच्यासोबत तीन एकरात लसूण पेरले होते. आता त्यांनी लसणाचे पीक घेतले असून त्या आता मूग पेरणीच्या तयारीत आहेत आणि त्यानंतर भाताची देखील पेरणी करणार आहेत. म्हणजेचं सासू-सूनेची ही जोड एका वर्षात तीन पिके घेऊन लाखो रुपये कमवत आहेत.
मित्रांनो आम्ही आपणांस सांगू इच्छितो की, अनिताचे पती विनोद जाखड यांनी पंजाबमध्ये जालंधर या ठिकाणी करारावर जमीन घेतली आहे. यामुळे ते पंजाबमध्ये शेती करण्यासाठी वास्तव्यास आहेत. यामुळे अनिता यांच्या खांद्यावर घरची सर्व शेती अवलंबून आहे. यामुळे घरच्या शेतजमीनीतील लागवडी पासून ते काढणीपर्यंत सर्व कामे अनिता आणि तिच्या सासूला करावी लागतात आणि त्या दोन्ही यशस्वीरीत्या हे काम पार पाडत आहेत.
अनिता व त्यांच्या सासूबाई यांनी नुकत्याच 15 दिवसापूर्वी मजुरांच्या मदतीने लसणाची काढणी केली असून त्यांना यातून एकरी सुमारे 50 क्विंटल लसणाचे उत्पादन मिळाले आहे. या दमदार उत्पादणामुळे सासूच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत आहे. सध्या मंडईंमध्ये 35 रुपये किलोचा घाऊक दर सुरू आहे. मात्र त्यांना आता लसणाची विक्री करायची नाही त्यांना लसणाचे दर अजून वाढणार अशी आशा आहे.
मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, अनिता जाखड यांच्या सासुबाई चमेली यांचे पती लालचंद जाखड यांचे 14 वर्षांपूर्वी आकस्मिक निधन झाले. यानंतर संपूर्ण घराची जबाबदारी चमेलीदेवीच्या खांद्यावर आली. तीन मुलगे आणि एका मुलीच्या संगोपनासाठी शेती हे एकमेव साधन होते.
चमेली देवी त्यांच्या 10 एकर शेतजमिनीत पारंपारिक पिकांची शेती करत होत्या. पण सूनबाई सुशिक्षित असल्याने तिने सासूसोबत शेतीचा संपूर्ण कायापालट करून टाकला. या सासू-सुनेने पहिल्या वर्षी एका कनालमध्ये लसणाची लागवड करून हजारो रुपये कमवले.
त्यानंतर दरवर्षी तीन ते चार एकरात लसणाची पेरणी केली जाऊ लागली. सासू-सुनेच्या मेहनतीमुळे वर्षाला लाखो रुपयांची कमाई होत आहे. दुसरीकडे, चमेली देवी यांचा मुलगा विनोद कुमार याने जालंधरमध्ये सात एकर जमिनीत लसणाचे बंपर पीक घेतले आहे.
भुतानखुर्दमध्ये वडिलोपार्जित जमिनीवर सासू व सून एकत्र शेती करत आहेत. तर पंचायत समिती सदस्या अनिता देवी यांचे पती विनोद कुमार हे पंजाबमध्ये कंत्राटावर जमीन घेऊन लाखो रुपये कमवत आहेत. निश्चितच सासू-सुनेने मिळवलेले हे यश इतर महिला शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी सिद्ध होणारे आहे.
महत्वाच्या बातम्या
MBA मासावाला!! प्रतिष्ठित कंपनीतील नोकरी सोडून सुरू केली मत्स्यशेती; आता महिन्याकाठी कमवतोय 11 लाख
Maharashtra Rain : राज्यात पावसाचे लवकरच आगमन!! बहावा बहरल्याने पाऊस लवकर येण्याची शक्यता वाढली
Share your comments