1. यशोगाथा

रसायनशास्त्रातील पदव्युत्तर तरुणाने शिक्षण सोडून एक एकर क्षेत्रातून कमावले लाखो रुपये. वाचून बसणार नाही विश्वास.

शेती करायची म्हंटले की त्या साठी सर्वात महत्वाची बाब म्हणजे कष्ट करण्याची तयारी. शेतीसाठी पूरक पाणी, खत आणि शेतजमीन या बाबी खूप महत्वाच्या आहेत शिवाय शेतीमधून जरा का फायदा मिळवायचा असेल तर कष्टाला पर्याय नाही.

किरण भेकणे
किरण भेकणे


शेती करायची म्हंटले की त्या साठी सर्वात महत्वाची बाब म्हणजे कष्ट करण्याची तयारी. शेतीसाठी पूरक पाणी, खत आणि शेतजमीन या बाबी खूप महत्वाच्या आहेत शिवाय शेतीमधून जरा का फायदा मिळवायचा असेल तर कष्टाला पर्याय नाही.

चक्क वडिलांचे निधन झाल्यावर न रडता आणि न खचून जाता या शेतकरी तरुण युवकाने एक एकर क्षेत्रामधून लाखो रुपयांचे उत्पन्न घेतले आहे.कष्टाच्या जोरावर शेतकरी राजा पाहिजे ते करू शकतो. अपार कष्ट करायची आणि सहन करायची ताकत बळीराज्यात असते आणि कष्टाशिवाय शेतीला पर्याय नाही हे खरच आहे.अचानक वडिलांचा मृत्यू झाल्यावर खचून न जाता या 22 वर्षीय शिक्षित तरुणाने एक एकर क्षेत्रातून लाख रुपये कमवून गावापुढे तसेच तालुक्यात आदर्श निर्माण केला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी माणगांव मधील 22 वर्षीय तरुणाने फक्त एक एकर क्षेत्रातून 100 टन उसाचे उत्पादन घेतले आहे. 100 टन उसाचे उत्पादन घेऊन कोल्हापूर भागातील शेतकऱ्यांसमोर एक नवीन आदर्श ठेवला आहे. 22 वर्षीय या तरुणाचे नाव वैभव शेरीकर असे आहे. अपार कष्ट करण्याची तयारी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, आणि रासायनिक खते याच्या जीवावर 1एकर क्षेत्रांत 100 टन उसाचे उत्पादन मिळू शकले असे वैभव ने कोल्हापूर भागातील शेतकऱ्यांना सांगितले आहे.

हेही वाचा:-राज्यातील या भागात केळी बागांमध्ये ‘कुकुंबर मोझॅक’ रोगाचे थैमान, वाचा सविस्तर

 

 


वयाच्या 22 व्या वर्षी वडिलांचे निधन झाल्यामुळे वैभव च्या डोक्यावरील छत्र हरवले होते. त्यामुळे घराच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी घरच्या वाट्याला आलेली 1 एकर जमीन त्यातच कष्ट करायला सुरुवात केली. वैभव शेरीकर या तरुणाने आपले पदवी चे शिक्षण रसायनशास्त्र या विभागात पूर्ण केले. आपले पदवी म्हणजेच BSC Chemical चे शिक्षण कोल्हापूर मधील जयसिंगपूर या शहरातून घेतले. उच्च शिक्षित असून सुद्धा वैभव ने शेती करण्याचा निर्णय घेऊन वर्षाकाठी लाखो रुपये कमवत आहे

हेही वाचा:-चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून करतायत मस्त्यपालन शेती, मोठ्या प्रमाणावर काढतायत अर्थिक उत्पन्न

वाट्याला आलेली 1 एकर जमिनीत वैभव ने उसाची लागण केली आधुनिक तंत्रज्ञान, रासायनिक खतांचा वापर करून वैभव ने एक एकर क्षेत्रातून उच्चांकी आणि विक्रमी उत्पादन घेतले. एक एकर एकरातून 100 टणाचे उत्पादन घेऊन वैभव ने 3 लाख रुपये कमावले. या विक्रमी उत्पादनामुळे त्या भागातील शेतकऱ्यांपुढे या तरुणाने आव्हान उभे केले आहे.

English Summary: A young man with a post-graduate degree in chemistry earned lakhs of rupees from an acre of land, leaving his education. Can't read and believe. Published on: 15 September 2022, 05:03 IST

Like this article?

Hey! I am किरण भेकणे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters