आजकाल आपण शेतकऱ्याच्या अनेक सक्सेस कहाण्या ऐकतो. टीव्ही वर वर्तमान पत्रामध्ये अनेक कहाण्या आपल्याला ऐकायला आणि बघायला मिळतात. वडिलांचे निधन झाल्यावर खचून न जाता या तरुणाने एक एकर क्षेत्रातून लाखो रुपयांचे उत्पादन घेऊन विक्रम केला आहे.कष्टाच्या जोरावर शेतकरी राजा पाहिजे ते करू शकतो. अपार कष्ट करायची आणि सहन करायची ताकत बळीराज्यात असते. अनेक परिस्थिती वर मात करून चक्क या 22 वर्षीय तरुणाने एक एकर क्षेत्रातून लाख रुपये कमवून सिद्ध केले आहे त्यामुळे सभोवताली च्या भागात या तरुणाच्या नावाची चर्चा सर्वत्र आहे.
कष्ट आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर :
कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी माणगांव मधील 22 वर्षीय मुलाने एक एकर क्षेत्रातून 100 टन उसाचे उत्पादन घेतले आहे. 100 टन उसाचे उत्पादन घेऊन कोल्हापूर भागातील शेतकऱ्यांसमोर आदर्श ठेवला आहे. 22 वर्षीय या तरुणाचे नाववैभव शेरीकर असे आहे. अपार कष्ट आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे 1एकर क्षेत्रांत 100 टन उसाचे उत्पादन मिळू शकले असे वैभव ने सर्व शेतकऱ्यांना सांगितले आहे.
वयाच्या 22 व्या वर्षी वडिलांचे निधन झाल्यामुळे वैभव च्या डोक्यावरील छत्र हरवले होते. त्यामुळे घराच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी घरच्या वाट्याला आलेली 1 एकर जमीन त्यातच कष्ट करायला सुरुवात केली. वैभव शेरीकर या तरुणाने आपले पदवी चे शिक्षण रसायनशास्त्र या विभागात पूर्ण केले. आपले पदवी म्हणजेच BSC Chemical चे शिक्षण कोल्हापूर मधील जयसिंगपूर येथे मध्ये पूर्ण केले.
शिक्षणाची आवड सुद्धा असताना वडिलांच्या अचानकपणे झालेल्या मृत्यमुळे वैभव ने शेती करण्याचे ठरवले. शेतीमुळे वैभव ने आपल्या शिक्षणाकडे सुद्धा दुर्लक्ष केले आणि आपले शिक्षण थांबवले.वाट्याला आलेली 1 एकर जमिनीत वैभव ने उसाची लागण केली आधुनिक तंत्रज्ञान, रासायनिक खतांचा वापर करून वैभव ने एक एकर क्षेत्रातून उच्चांकी आणि विक्रमी उत्पादन घेतले. एक एकर एकरातून 100 टणाचे उत्पादन घेऊन वैभव ने 3 लाख रुपये कमावले. या विक्रमी उत्पादनामुळे त्या भागातील शेतकऱ्यांपुढे या तरुणाने आव्हान उभे केले आहे.
Share your comments