1. यशोगाथा

मावळ मधील शेतकऱ्याने 30 गुंठे स्ट्रॉबेरी शेतीतून मिळवला 20 लाखांचा नफा

नवीन तंत्रज्ञान विकसित करून शेती केल्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात शेतीतून उत्पन्न मिळवत आहेत. यांत्रिकीकरनामुळे कमी वेळेत जास्त शेतीची कामे होऊ लागली त्यामुळे वेळेची सुद्धा बचत होऊ लागली आहे.कोणत्याही ठिकाणी शेती करण्यासाठी तेथील भौगोलिक स्थितीनुसार पिकांचे उत्पन्न घेतले जाते. ज्या पिकास योग्य वातावरण पोषक ठरते तीच पिके ज्या त्या भागात घेतली जातात. स्ट्रॉबेरी म्हटलं की आपल्या समोर येते ते म्हणजे महाबळेश्वर आणि पाचगणी.

किरण भेकणे
किरण भेकणे
strawberries

strawberries

नवीन तंत्रज्ञान विकसित करून शेती केल्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात शेतीतून उत्पन्न मिळवत आहेत. यांत्रिकीकरनामुळे कमी वेळेत जास्त शेतीची कामे होऊ लागली त्यामुळे वेळेची सुद्धा बचत होऊ लागली आहे.कोणत्याही ठिकाणी शेती करण्यासाठी तेथील भौगोलिक स्थितीनुसार पिकांचे उत्पन्न घेतले जाते. ज्या पिकास योग्य वातावरण पोषक ठरते तीच पिके ज्या त्या भागात घेतली जातात. स्ट्रॉबेरी म्हटलं की आपल्या समोर येते ते म्हणजे महाबळेश्वर आणि पाचगणी.


30 गुंठे क्षेत्रात स्ट्रॉबेरी लागवड:

स्ट्रॉबेरी हे फळ बऱ्याच लोकांचे आवडते आहे. सोबतच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा स्ट्रॉबेरी ला मोठी मागणी आहे.शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून आपण यशस्वी होऊ शकतो हे मावळ मधील प्रदीप धामकर या प्रगतशील शेतकऱ्याने दाखवून दिले आहे.सुरवातीच्या काळात मावळ मध्ये केवळ भात  आणि उसाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात  घेतले  जात  असायचे.परंतु मावळ मधील एका युवा प्रगतशील शेतकऱ्याने मावळ मध्ये 30 गुंठे क्षेत्रात स्ट्रॉबेरी लागवड करून 20 लाखांचा नफा मिळवला आहे.

आंतराष्ट्रीय बाजारपेठत दीड हजार प्रति किलो भाव:-

मावळ तालुका हा थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. या भागात भात आणि उसाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतले जाते. परंतु  आता  महाबळेश्वरमध्ये  पिकणारी  ‘विंटर  डाऊन’ या प्रजातीची स्ट्रॉबेरी मावळ मध्ये पिकू लागली आहे.हे केवळ प्रदीप धामकर यांच्या प्रयत्नामुळे शक्य झाले आहे. स्ट्रॉबेरी ला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी असते. या मावळ च्या स्ट्रॉबेरी ला आंतरराष्ट्रीय बाजारात दीड हजार रुपये प्रति किलो एवढा भाव मिळाला आहे. या स्ट्रॉबेरी ची विक्री दुबई, मस्कत, सिंगापूर या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विकली जात आहे.


20 लाख रुपयांचा निव्वळ नफा:-

मावळ मध्ये स्ट्रॉबेरी चे पीक घेण्यासाठी प्रदीप धामकर यांना केवळ 5 लाख रुपयांचा खर्च आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या स्ट्रॉबेरी ला 1000 ते 1500 रुपये प्रति किलो  एवढा  भाव मिळाला आहे. यामुळे 30 गुंठे क्षेत्रातून त्यांना कमीत कमी 20 लाख ते 25 लाख रुपये मिळणार आहेत. प्रत्येकी रोपापासून 1 किलो स्ट्रॉबेरी चे उत्पन्न मिळते. त्यामुळं उत्पन्न  सुद्धा  मोठ्या प्रमाणात निघत आहे. प्रदीप धामकर यांनी मावळ मधील शेतकरी वर्गाला शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्याचे आवाहन सुद्धा केले आहे.

English Summary: A farmer in Maval earned a profit of Rs 20 lakh from cultivating 30 guntas of strawberries. Published on: 16 November 2021, 12:48 IST

Like this article?

Hey! I am किरण भेकणे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters