सध्या शेतकरी बांधव (Farmers) नगदी आणि हंगामी पिकाकडे (Cash & Seasonal Crop) मोठ्या प्रमाणात वळू लागले आहेत. विदर्भातील शेतकरी देखील आता पीकपद्धतीत बदल करीत पालेभाज्या व अल्पकालावधीत काढणीसाठी तयार होणाऱ्या पिकांची लागवड करू लागले आहेत. नागपूर जिल्ह्यातील (Nagpur District Farmers) उमरेड येथील एका शेतकऱ्याने देखील पालेभाज्या लागवडीचा निर्णय घेतला.
विशेष म्हणजे उमरेड येथील नितीन यादव रहाटे या नवयुवक शेतकऱ्याने उन्हाळी हंगामात टोमॅटोची लागवड (Summer Season Tomato Farming) यशस्वी करून दाखवली आहे यामुळे त्याचे पंचक्रोशीत मोठे कौतुक केले जात आहे. या अवलिया शेतकऱ्याने उन्हाळी हंगामात शिवापुर शिवारातील जवळपास 31000 टोमॅटो रोपांची लागवड केली आहे.
IMPORTANT NEWS : कोण म्हणतं शेती तोट्याची? अहमदनगर मधील शेतकऱ्यांनी ढेमसे लागवड करून चार महिन्यात केली 60 लाखांची उलाढाल
उन्हाळी हंगामात टोमॅटोची शेती करणे मोठे जोखीमीचे कार्य असते. त्यातल्या त्यात यंदा तापमानात नेहमीपेक्षा अधिक वाढ बघायला मिळत आहे. सध्या विदर्भात तापमान 42 ते 43 अंश सेल्सिअस दरम्यान कायम आहे.
अशा वातावरणात टोमॅटोची शेती करणे मोठे चॅलेंजिंग काम मात्र असे असले तरी उमरेडच्या या पठ्ठ्याने टोमॅटोची लागवड उन्हाळी हंगामात यशस्वी करून दाखवली आहे. नितीन यांनी योग्य व्यवस्थापन करून आपल्या मेहनतीच्या जोरावर हे शक्य करून दाखवले आहे. नितीन आणि उन्हाळी हंगामात टोमॅटो पिकासाठी रासायनिक तसेच ऑरगॅनिक खतांचा योग्य वापर केला आहे.
हेही वाचा : Breaking News : शेतकऱ्यांना मोदी सरकार अक्षयतृतीयेला देणार एक खास भेट; वाचा काय आहे माजरा
नितीन यांनी एक फेब्रुवारी रोजी पाच एकर क्षेत्रात टोमॅटोची यशस्वी लागवड केली. यानंतर स्वतः जातीने लक्ष घालत पाण्याचे तसेच खतांचे व्यवस्थापन केले. सध्या नितीन यांच्या टोमॅटो पिकाची काढणी सुरू आहे. एका झाडाला पाच ते सहा किलो टोमॅटो लागले आहेत.
नितीन आणि उन्हाळी हंगामात लावलेले टोमॅटोचे पीक दर्जेदार असल्याने व्यापाऱ्यांचे लक्ष वेधले गेले आहे. टोमॅटोला 250 ते 350 रुपये कॅरेटप्रमाणे दर मिळत आहे. सध्या मिळत असलेला टोमॅटोला तर अपेक्षित नसला तरीदेखील समाधानकारक असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
नितीन यांना अशी आहे की येत्या काही दिवसात टोमॅटोचा दर वाढण्याची वाढतील आणि निश्चित त्यांना याचा फायदा मिळेल. नितीनने आपल्या शेतात नवनवीन प्रयोग केले आहेत त्यांनी आपल्या शेतात लसूण, कांदे, कारली, पपई इत्यादी पिकांची लागवड केली आहे. एकंदरीत उन्हाळी टोमॅटो लागवड करणे जोखमीचे असले तरी देखील फायदेशीर ठरू शकते मात्र यासाठी योग्य नियोजनाची आवश्यकता असल्याचे नितीन यांनी स्पष्ट केले.
Important News : कांद्याने केला वांदा! कपाशी उपटून लावला कांदा अन आता म्हणतोय कांदा नको रे बाबा
Share your comments