सोलापूर जिल्ह्याच्या पश्चिम नातेपुतेजवळ दुर्गम, डोंगराळ भागांत पाच हजार लोकसंख्या असलेले आणि ७०० उंबऱ्यांचे फडतरी गाव यांत्रिकीकरणामुळे आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. यामुळे या गावाची एक चर्चा सुरु असते. कमी पाणी आणि दुष्काळी पट्ट्यामुळे गावात शेतीला फारसा वाव मिळाला नाही. मात्र येथील तरुणांनी हार न मानता एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे.
गावच्या तरुणांनी २०-२५ वर्षांपूर्वी ट्रॅक्टर व्यवसायात उडी घेतली. एकेक करत एकेक तरुण या व्यवसायात उतरला. सुमारे ३६० ट्रॅक्टर ७० पोकलेन आणि डझनभर जेसीबी यांसारख्या वाहनांनी फडतरी (Fadtari) (ता. माळशिरस) गावाने यांत्रिकीकरणात (Mechanization) स्वतःची ओळख तयार केली आहे.
विहीर, शेततळी खोदण्यासह शेती विकसित करण्याच्या कामात फडतरीतील या ट्रॅक्टर आणि पोकलेननी महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवड्याच्या अनेक भागांत आपल्या कामाने नाव कमावले आहेच, पण थेट कर्नाटक आणि तमिळनाडूच्या शिवारापर्यंतही मजल मारली आहे. यामुळे आता हे तरुण कोट्यधी कमवत आहेत. यामुळे त्यांना चांगले दिवस आले आहेत.
नॅनो-डीएपीला दोन दिवसांत मान्यता मिळणार, नेहमीच्या खताच्या तुलनेत निम्म्या भावात उपलब्ध होणार..
विदर्भातील यवतमाळ, वर्धा, मराठवाड्यातील नांदेड, लातूरसह कर्नाटक आणि तमिळनाडूसारख्या परराज्यांतूनही फडतरीतील पोकलेन, जेसीबींना मागणी आहे. याचे कारण म्हणजे वेळेत आणि चोख काम हे करून मिळते. दिवाळीनंतर ऑक्टोबरपासून मेपर्यंत पावसाळा सुरू होईपर्यंत, जवळपास आठ महिने फडतरीतील सर्व वाहने या कामात गुंतलेली असतात.
फुले ११०८२! ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर जात...
यामुळे आता मशिनींचे काही काम असल्यास याच ठिकाणचा पत्ता दिला जातो. या गावात आज घरटी किमान एक ट्रॅक्टर आपल्याला पाहायला मिळतो. काळानुरूप पुढे ट्रॅक्टरबरोबर जेसीबी आणि पोकलेनसारख्या मशिनी देखील वाढत गेल्या. यामुळे तरुणांना रोजगाराचा प्रश्न मिटला.
महत्वाच्या बातम्या;
मोलॅसिस विक्रीची रक्कम शेतकऱ्यांना द्या, प्रत्येक उपपदार्थांच्या विक्रीचा नफा शेतकऱ्यांना मिळणार, सरकारचा मोठा निर्णय, शेतकऱ्यांना दिलासा
दारू मटण सोडून जळगावात नववर्षाच्या स्वागताला गोमूत्र प्राशनाची अनोखी पार्टी
कोरोना जवळ आला असताना डॉक्टर संपावर, आरोग्य यंत्रणा कोलमडण्याची शक्यता
Share your comments