सध्या तरुण शेतकरी हे पारंपरिक पद्धतीने शेती न करता आधुनिक शेती करत आहेत. पिके देखील वेगवेगळी घेऊन उत्पादन वाढवत आहेत. आता एका युवा शेतकऱ्यानं सव्वा एकर पपईच्या शेतीतून (Papaya Farming) तब्बल 23 लाखांचे उत्पन्न घेतले आहे.
यामुळे या शेतकऱ्याचे कौतुक केले जात आहे. सांगली (Sangli) जिल्ह्यातील कुंडल (Kundal) येथील प्रतिक पुजारी (Pratik Pujari) असे या 25 वर्षीय युवा शेतकऱ्याचे नाव आहे.
प्रतिक पुजारी हे सांगली जिल्ह्यातील कुंडल गावचे शेतकरी. त्यांनी त्यांच्या सव्वा दोन एकरवर क्षेत्रावर पपईची लागवड केली आहे. यामध्ये त्यांनी 1 हजार 100 पपईची झाडे लावली आहेत. त्यांनी आत्तापर्यंत 210 टन पपईचे उत्पादन काढले आहे.
शेतकऱ्यांनो काळजी घ्या! शेतकऱ्यांच्या कृषिपंपाच्या केबलवर मारला जातोय डल्ला..
यामध्ये त्यांना 23 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाल्याचे प्रतिक पुजारी यांनी सांगितले. त्यांनी 15 नंबर या पपईच्या वाणाची लागवड केली आहे. यामध्ये अजून 30 टन उत्पादन निघण्याची शक्यता आहे.
पपईची विक्री त्यांनी मुंबईच्या वाशी मार्केटमध्ये केली. या पपईच्या शेतीसाठी रासायनिक तसेच सेंद्रीय खतांचा वापर केला. पाण्याचे योग्य नियोजन केले. ड्रीप पद्धतीने बागेला पाणीपुरवठा देखील त्यांनी केला आहे.
कष्ट दमदार करायचं आणि आपल्या रुबाबात जगायच! शेतकऱ्याने इंडिव्हर गाडीतून विकली भाजी..
दरम्यान, पपईच्या 15 नंबर वाणाला बाजारात मोठी मागणी आहे. यावर रोगांचा प्रादुर्भाव देखील कमी प्रमाणात होतो. पण शेतकऱ्यांनी मार्केट बघून पपईचे उत्पादन घ्याव असेही सलगर म्हणाले.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो आता सुरु करा पशुखाद्य बनवण्याचा व्यवसाय, दुग्ध व्यवसाय आता वाढतच जाणार आहे.
शेतकऱ्यांनो कमी वेळेत लाखोंची कमाईसाठी डुक्कर पालनाचा व्यवसाय फायदेशीर, वाचा सविस्तर
बातमी कामाची! जनावरांना ३०० रुपयांचा विमा, नुकसान झाल्यास ८८ हजार रुपये सरकार देणार
Share your comments