1. इतर बातम्या

केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेतून तरुणांना मिळेल रोजागार

प्रधानमंत्री कौशल विकास योजनेमुळे शाळा सोडणाऱ्या युवकांसाठी उत्तम संधी चालून आली आहे. या योजनेचा विचार केला तर ही योजना ही भारत सरकारची योजना असून या योजनेअंतर्गत बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतील तसेच या योजनेचे उद्दिष्ट हे देशातील सुमारे 40 कोटी लोकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देणे आहे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
तरुणांना मिळणार रोजगार

तरुणांना मिळणार रोजगार

प्रधानमंत्री कौशल विकास योजनेमुळे शाळा सोडणाऱ्या युवकांसाठी उत्तम संधी चालून आली आहे. या योजनेचा विचार केला तर ही योजना ही भारत सरकारची योजना असून या योजनेअंतर्गत बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतील तसेच या योजनेचे उद्दिष्ट हे देशातील सुमारे 40 कोटी लोकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देणे आहे.

या योजनेसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नसून त्याऐवजी सरकारकडून देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे पैसे सुमारे 8 हजार रुपये मिळतात.  या योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ  pmkvyofficial org वर  जावे.

 या योजनेसाठी अर्ज कसा करावा

 प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेत सामील होण्यासाठी प्रथम अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करावी लागते. यासाठी अगोदर वरती दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन आपले स्वतःचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, जन्मतारीख आणि इमेल करून तिथे नोंदणी करावी.  नोंदणी फॉर्म भरल्यानंतर आपण ज्या क्षेत्रामध्ये प्रशिक्षण घेऊ इच्छिता ते निवडायचे असते त्या अंतर्गत कन्स्ट्रक्शन, इलेक्ट्रॉनिक्स, हार्डवेअर, फुड प्रोसेसिंग, फर्निचर आणि फिटिंग हँडीक्राफ्ट, जेम्स अँड ज्वेलरी तसेच लेदर टेक्नॉलॉजी सारखे सुमारे 40 टेक्निकल कोर्स समाविष्ट आहेत.

  

या योजनेअंतर्गत विनामूल्य प्रशिक्षण

 या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी किंवा शुल्क आकारले जात नाही. याव्यतिरिक्त स्वतः सरकार सहभागी उमेदवारांना फ्रीज मनी म्हणून 8000 प्रदान करते. यासाठी नोंदणी तीन महिने, सहा महिने आणि एका वर्षाच्या कालावधीसाठी असते. प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र दिले जाते व या प्रमाणपत्र च्या मदतीने आपण देशात कोठेही काम मिळवू शकता.

 

प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर परीक्षा

 या योजने अंतर्गत प्रशिक्षण घेतल्यानंतर रोजगार तसेच आर्थिक सहाय्य देखील दिले जाते. या योजनेचा प्रमुख हेतू म्हणजे कमी शिक्षित आणि ज्यांनी शाळा सोडली आहे अशा तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देणे हा आहे. पी एम के वि प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आपली कंपनी प्रथम आपली परीक्षा घेते आणि परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांना कौशल्य प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येते.

English Summary: Youth can get employment from these scheme of central government Published on: 17 March 2021, 02:45 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters