जर तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये जास्त पैसा कमवायचा असेल तरआज आपण एक जबरदस्त बिझनेस आयडिया माहिती करून घेणार आहोत.
जो व्यवसाय सुरु करुन तुम्ही कमीत कमी वेळेत चांगला नफा कमवू शकतात. तो व्यवसाय म्हणजे ऑनलाईन पेट्रोल आणि डिझेल विक्री करणे हा होय. जर तुम्ही पेट्रोल आणि डिझेल ची डोअर टू डोअर होम डिलिव्हरी चा व्यवसाय सुरू केला तर महिनाभरात तुम्ही चांगला पैसा कमवू शकतात.
यासाठी तुम्हाला बनवावे लागेल एखादे ॲप
सगळ्यात अगोदर तुम्हाला पेट्रोल आणि डिझेल ऑनलाईन विक्री करण्यासाठी एक ॲप किंवा एक वेबसाईट बनवावी लागेल. या ॲप किंवा वेबसाईट च्या माध्यमातून ग्राहक तुम्हाला पेट्रोल आणि डिझेल चे ऑनलाईन बुकींग ऑर्डर करू शकतील.
यामध्ये गुंतवणूक
जर तुम्हाला पेट्रोल-डिझेल होम डिलिव्हरी व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी अंदाजे बारा लाख रुपयांची गुंतवणूक आवश्यक आहे. जर तुमच्याकडे एवढी गुंतवणुकीसाठी रक्कम नाहीतर तुम्ही बँकेचा आधार घेऊ शकता. बँकेच्या माध्यमातून पीएम मुद्रा लोन त्या माध्यमातून दहा लाख रुपयांपर्यंतचे कर्ज यामध्ये मिळू शकते.
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक गोष्टी
1- जर तुम्हाला पेट्रोल व डिझेल चा ऑनलाईन व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला अगोदर तेल कंपन्यांसोबत संपर्क करावा लागेल.
2- त्यानंतर तेल कंपन्यांना तुम्हाला तुमचा सगळा प्रोजेक्ट विषयाची माहिती आणि रिपोर्ट द्यावा लागेल.
3- जर तेल कंपन्यांना तुमचा प्रोजेक्ट आवडला तर ते पेट्रोल डिझेल होम डिलिव्हरी व्यवसायासाठी तुम्हाला परवानगी येऊ शकतात.
पेट्रोल डिझेल ऑनलाईन विक्री मधून ग्राहकांना मिळणारे फायदे
1-बऱ्याचदा अर्ध्या रस्त्यात पेट्रोल आणि डिझेल संपण्याची समस्या येते त्यापासून सुटका मिळू शकते.
2- काही तासांमध्ये पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध होईल.
3- पेट्रोल पंपांवर असलेल्या लांबच लांब रांगा पासून सुटका होईल.
यामधून किती कमाई होऊ शकते?
सध्या परिस्थिती पाहता देशात असलेल्या वाढत्या महागाईला समोर ठेवले तर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ होण्याची जास्त शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जर पेट्रोल आणि डिझेल चा होम डिलिव्हरी व्यवसाय सुरू केला तर तुम्ही घर बसल्या लाखो रुपये कमावू शकतात.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:……. आता यामुळे कीटकनाशकांच्या दरात वाढ होणार; शेतकरी पुन्हा आर्थिक कोंडीत येणार
Share your comments