काय आहे ही गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा योजना; जाणून घ्या फायदे अन् पात्रता

11 August 2020 01:51 PM


पुणे : शेती हा बेभरवश्याचा धंदा आहे,असे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. पण शेतीतील काम करणाऱ्यांची संख्या कमी झाली नाही. शेतकरी स्वतःचा जीव धोक्यात घालून शेती करत असतो. जेव्हा, एखाद्या शेतकऱ्याचा शेतात काम करताना वीज पडून मृत्यू होतो तेव्हा त्याचं कुटुंबाचे काय होत असेल याचा विचार करून आपले मन सुन्न होते. त्याच्या कुटुंबाचे काय होईल याचा विचार आपण करतो. सरकारनेदेखील हाच विचार करून गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा सुरु केली आहे.  त्या योजनेच्या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत.

राज्यात शेती व्यवसाय करतांना होणारे अपघात,वीज पडणे,पूर,सर्पदंश,विंचूदंश,विजेचा शॉक बसने इत्यादी. नैसर्गिक आपत्तीमुळे होणार अपघात, रस्त्यावरील अपघात,वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणांमुळे होणारे अपघात यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू ओढवतो किंवा काहींना अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता स्वतंत्र विमा योजना नसल्यामुळे शासनाने सन २००५-०६ पासून शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना कार्यान्वित केलेली आहे.  सन २०१५-१६ मध्ये सदर योजना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना महाराष्ट्र राज्यात सुरु करण्यात आली आहे.

 


गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची काय आहे पात्रता 

महाराष्ट्र राज्यातील 10 ते 75 वयोगटातील महसूल नोंदी नुसार विमा पॉलिसी लागू झालेल्या तारखेस खातेदार असलेला शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील वहितिधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले कोणताही एक सदस्य (आई,वडिल, शेतकर्याची पती/पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती) असे 10 ते 75 वर्षे वयोगटातील एकुण दोन जण. 

या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विमा मिळत असतो. शेतातील अपघाती मृत्यूनंतर विमाधारकांच्या घरच्यांना रक्कम मिळत असते.

या योजनेअंतर्गत कोणते संरक्षण मिळते ?

१) अपघाती मृत्यू. : २ लाखाचे संरक्षण

२) अपघातात एक हात अथवा पाय आणि दोन डोळे  निकामी होणे : २ लाखांचे विमा संरक्षण

३) अपघातात एक डोळा किंवा एक हात अथवा पाय  निकामी होणे. : १ लाखाचे विमा संरक्षण

काय आहेत या योजनेची वैशिष्टये

१) शेतकऱ्यांनी स्वतः किंवा त्याच्यावतीने अन्य कोणत्याही संस्थेने या योजनेत पुन्हा स्वतंत्ररित्या विमा हप्त्याची रक्कम भरण्याची गरज नाही.शासनाकडून सर्व खातेदार शेतकऱ्यांचा विमा भरण्यात येतो.

२) यापूर्वी शेतकऱ्यांनी अथवा त्यांच्या वतीने अन्य कोणत्याही संस्थेने कोणत्याही वेगळी विमा योजना लागू केली असल्यास अथवा विमा उतरविला असल्यास त्याचा या योजनेशी काहीही संबंध राहणार नाही. या विमा योजने अंतर्गत मिळणारे लाभ स्वतंत्र असतील.

३ ) योजनेचा लाभ मिळण्यासाठी विहित केलेली प्रमाणपत्रे /कागदपत्रे वगळता अन्य कोणतीही कागदपत्रे शेतकऱ्यांनी सदर करण्याची आवश्यकता नाही.

 


या योजनेअंतर्गत विमा संरक्षण मिळवण्यासाठी आवश्यक असणारी  कागदपत्रे

१) विहित नमुन्यातील पुर्व सुचनेचा अर्ज  (सहपत्र क्र.1) पुर्व सूचने सोबत आवश्यक कागद पत्रे-a)7/12 उतारा किंवा 8अ.(मुळ प्रत)

२) मृत्यू दाखला (स्वयं साक्षांकीत प्रत)

३) प्रथम माहिती अहवाल.

४) विजेचा धक्का अपघात, विज पडून मृत्यू, पाण्यामध्ये बुडून मृत्यू, उंचावरुन पडून झालेला मृत्यू, सर्प दंश/ विंचू दंश व अन्य कोणतेही अपघात यासाठी प्रथम माहिती अहवाल किंवा पोलिस पाटील अहवाल.

५) घटनास्थळ पंचनामा (स्वयं साक्षांकीत प्रत)

६) वयाचा दाखला (नसल्यास शपथपत्र)

सदरचा दावा दुर्घटने नंतर शक्यतो ४५ दिवस कालावधीत नोंदवण्यात यावा.

अधिकची कागदपत्रे

ज्या नोंदीवरुन अपघातग्रस्त शेतकऱ्याचे नाव 7/12 वर आले असेल अशी संबंधीत फेरफार नोंद (गाव नमुना नं.6 ड) मुळ उतारा अथवा फेरफार नोंदी बाबत सक्षम प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र.

१) शेतकऱ्ंयाचे वारस म्हणून गावकामगार तलाठ्याकडील गाव नमुना नं. 6 क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद. मुळ उतारा अथवा वारसाच्या नोंदीबाबत सक्षम प्राधिकृत अधिकाऱ्याने प्रमाणपत्र.

२) विहित नमुन्यातील कार्यकारी दंडाधिकारी यांचे समोर केलेले प्रतिज्ञापत्र (प्रपत्र-ग). (मुळ प्रत.)

३) याशिवाय अपघाताच्या घटनेच्या स्वरुपानुसार पुराव्यादाखल सादर करावयाची प्रपत्र-क मधील कागदपत्रे.

४) रस्ता/रेल्वे अपघात- इन्क़्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल, विमा संरक्षित व्यक्ती वाहन चालविताना अपघात झाल्यास त्याचा मोटार वाहन परवाना.

५)  पाण्यामध्ये बुडून मृत्यू- इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल, बुडून बेपत्ता झाल्यास फक्त प्रथम माहिती अहवाल व क्षतीपूर्ती बंधपत्र आवश्यक.

६) जंतूनाशक अथवा अन्य कारणांमुळे विषबाधा- इन्क्वेस्ट  पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल, रासायनिक विश्लेषण अहवाल (व्हिसेरा अहवाल).

७) विजेचा धक्का अपघात / विज पडून मृत्यू- इन्क्वेस्ट  पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल.

८) खून- इन्क्वेस्ट  पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल, रासायनिक विश्लेषण अहवाल (व्हिसेरा अहवाल), दोषारोप पत्र.

९) उंचावरून पडून झालेला मृत्यू- इन्क्वेस्ट  पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल, पोलीस अंतीम अहवाल.

१०) सर्प दंश/ विंचू दंश- इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल, वैद्यकीय उपचारा पुर्वीच निधन झाल्याने पोस्ट मॉर्टेम झाले नसल्यास या अहवालातून सूट मात्र वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र शासकीय आरोग्य केंद्र अधिकाऱ्याकडून प्रतिस्वाक्षरीत असणे आवश्यक.

११) नक्षलवाद्याकडून झालेल्या हत्या- इन्क्वेस्ट  पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल, नक्षलवादी हत्ये संदर्भातील कार्यालयीन कागदपत्र.

१२) जनावरांच्या चावण्यामूळे रेबिज होऊन मृ्त्यू झाल्यास  औषधोपचाराची कागदपत्रे.

१३)  जनावरांच्या हल्ल्यात जखमी होवुन मृत्यू-इन्क्वेस्ट  पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल.

१४)  जनावरांच्या हल्ल्यात मृत्यू होवुन शव न मिळणे- क्षतीपूर्ती बंधपत्र आवश्यक.

१५)  दंगल- इन्क्वेस्ट  पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल, दंगली बाबतची कार्यालयीन कागदपत्रे.

१६)  अन्य कोणतेही अपघात- इन्क्वेस्ट  पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल, पोलिस अंतीम अहवाल.

१७ अपंगत्वाच्या लाभाच्या पुराव्यासाठी सादर करावयाची कागदपत्रे- अपंगत्व अथवा अवयव निकामी होण्याचे कारणाबाबतचे डॉक्टरांचे अंतीम प्रमाणपत्र अथवा दवाखान्याच्या नोंदी, प्राथमिक आरोग्य केंद्र/उपकेंद्र/जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रतिस्वाक्षरीसह कायम अपंगत्वाचे प्रमाणपत्र.

अर्ज करण्याचे ठिकाण

तालुका कृषी अधिकारी कार्यालय.

Gopinath Mundhe Farmers Accident Insurance Scheme state government Farmers Accident Insurance Scheme गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा योजना शेतकरी अपघात विमा योजना राज्य सरकार
English Summary: What is Gopinath Mundhe Farmers Accident Insurance Scheme? know the benefits and eligibility

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.