हवामान आधारीत फळपिक विमा योजना 2018-19 फळपीक-काजू

13 November 2018 07:19 AM


ही योजना काजू पिकासाठी अधिसुचित जिल्ह्यामधील, अधिसुचित तालुक्यातील, अधिसुचित महसूल मंडळात लागू आहे. यानुसार निवडलेल्या विमा कंपनी मार्फत अधिसूचित महसूल मंडळ पातळीवर शासनमान्य संदर्भ हवामान केंद्र आकडेवारी वरुन नुकसान भरपाई अंतिम केली जाते.

समविष्ट जिल्हे (०७)कोल्हापूर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, नाशिक इत्यादी.

या योजनेतंर्गत काजू पिकास निवडलेल्या विमा कंपनी मार्फत खाली नमूद केलेल्या विमा संरक्षण कालावधीत निवडक हवामान धोक्यामुळे होणाऱ्या संभाव्य पिक नुकसानीस (आर्थिक) खालीलप्रमाणे विमा संरक्षण प्रदान होईल.

विमा संरक्षण प्रकार (हवामान धोके) विमा संरक्षण कालावधी

प्रमाणके (ट्रिगर) नुकसान भरपाई रक्कम (प्रति हेक्टर रु.)

अवेळी पाऊस
दि. 1 डिसेंबर 2018 ते 28 फेब्रुवारी 2019

कोणत्याही एका दिवशी 5 मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रु. 11,000/- देय
कोणत्याही दोन दिवशी 5 मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रु. 22,000/- देय
कोणत्याही तीन दिवशी 5 मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रु. 38,500/- देय
कोणत्याही चार दिवशी 5 मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रु. 55,000/- देय

कमी तापमान
दि. 1 डिसेंबर 2018 ते 28 फेब्रुवारी 2019

तापमान सलग 3 दिवस 13 डि.ग्री. सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी झाल्यास रु. 11,450/- देय
तापमान सलग 4 दिवस 13 डि.ग्री. सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी झाल्यास रु. 17,150/- देय
तापमान सलग 5 दिवस 13 डि.ग्री. सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी झाल्यास रु. 28,600/- देय

विमा योजनेत सहभाग प्रक्रिया :

कर्जदार शेतकरी: अनिवार्य सहभाग, बँकाकडून काजू पिकासाठी कर्ज मंजूर असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचा विमा हप्ता त्या त्या बँकाकडून देण्यात येणाऱ्या कर्ज पुरवठा रकमेमधून भरला जाईल.
बिगर कर्जदार शेतकरी: ऐच्छीक सहभाग, सदर शेतकऱ्यांनी विमा प्रस्ताव पत्रक भरुन रोख विमा हप्त्यासह विहित मुदतीत विमा योजनेत सहभाग घ्यावा.
योजनेत सहभाग घेण्याचा अंतिम दिनांक: 30 नोव्हेंबर 2018

बाब

विमा संरक्षित रक्कम (रु. प्रति हेक्टर)

शेतकर्‍याने भरावयाचा विमा हप्ता (रु. प्रति हेक्टर)

अवेळी पाऊस, कमी तापमान या हवामान धोक्यापासून संरक्षण

83,600/-

4,180/-

गारपीट हवामान धोक्यापासून विमा संरक्षण (विमा संरक्षण कालावधी दि. १ जानेवारी २०१९ ते ३० एप्रिल २०१९ )

27,867/-

1,394/-

एकूण विमा संरक्षण

1,11,467 /-

5,574/-

गारपीट हवामान धोक्यापासून विमा संरक्षण घेण्याची बाब ऐच्छीक आहे. गारपीटीने नुकसान झाल्यास 48 तासाच्या आत संबंधित विमा कंपनीला कळवावे.


योजना
कार्यान्वित करणारी यंत्रणा:

सदर फळपिक विमा योजना खालील यंत्रणेमार्फत खालील जिल्हयातील काजू फळ पिकासाठी अधिसूचित केलेल्या महसूल मंडळ पातळीवर कार्यान्वित करण्यात येईल.

अ.क्र. विमा कंपनीचे नाव जिल्हे एकूण जिल्हे
1 दि न्यू इंडिया इन्शुरेंस कंपनी
फोन क्र. ०२२-२२७०८१००
टोल फ्री.क्र. १८०० २०९१ ४१५
ईमेल: pmfby.ho@newindia.co.in
रत्नागिरी 1
2 अॅग्रिकल्चर इन्शुरेंस कंपनी ऑफ इंडिया लि.
फोन क्र. ०२२-६१७१०९१२ 
टोल फ्री.क्र. १८०० १०३० ०६१
ईमेल: mhwbcis@aicindia.com
कोल्हापूर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, पालघर, नाशिक 06


या योजनेत भाग घेण्यासाठी शेतकर्‍यांनी संबंधित विमा कंपनी, संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे संपर्क साधून अधिक सविस्तर माहिती घ्यावी आणि योजनेत सहभाग घ्यावा.

श्री. विनयकुमार आवटे, 
अधिक्षक कृषि अधिकारी (मनरेगा), पुणे विभाग 
9404963870

हवामान आधारीत फळपिक विमा योजना weather based fruit crop insurance scheme cashew काजू
English Summary: weather based fruit crop insurance scheme 2018-19 for cashew fruit crop

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.