1. इतर

दोन दिवसात येणार उज्ज्वला योजनेचे पैसे ; जाणून घ्या! योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

KJ Staff
KJ Staff


जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून जगातील अनेक देश हे लॉकडाऊन झाले आहेत. देशात लॉकडाऊन पुकारण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याची घोषणा केली होती. या लॉकडाऊनमध्ये गरीब लोकांना त्रास होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून काही दिलासादायक घोषणाही करण्यात आल्या.

मोफत अन्न पुरवठा, नोकरदार वर्गासाठी काही बँकांच्या हफ्त्यात सवलत अशा अनेक घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी केल्या होत्या. त्यात अजून एक घोषणा होती, ती घोषणा गरीब लोकांच्या हिताची होती. ही घोषणा उज्ज्वला गॅस संबंधीची घोषणा होती. तीन महिने गॅस सिलेंडर मोफत दिले जाईल अशी घोषणा सरकारकडून करण्यात आली होती. या गॅस सिलेंडरसाठी लागणारा पैसा लवकरच लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. साधारण तीन ते चार एप्रिल पर्यंत सरकार आपल्या बँक खात्यात  पैसे टाकणार आहे. त्यानंततर लाभार्थी गॅस सिलेंडरची बुकिंग करु शकता. तर दुसरा सिलेंडर तुम्ही १५ दिवसांनी बुकिंग करु शकता.

काय आहे उज्ज्वला योजना : द्रारिद्य रेषेखालील कुटुंबांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही योजना १ मे २०१६ पासून  सुरू केली आहे. या योजनेतून सरकार तुम्हाला एलपीजी गॅस कनेक्शन देते. ही योजना केंद्र सरकारचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाच्या मदतीने चालवली जात आहे. ग्रामीण भागात स्वंयपाक करण्यासाठी गृहणी चुलीचा उपयोग करत असतात. यातून निघणाऱ्या धुरामुळे महिलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असतात. पंतप्रधान उज्ज्वला योजनेमुळे महिलांना लाभ होणार असून त्यांचे आरोग्य चांगले राहणार आहे. दरम्यान कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन करण्यात आला.

उज्ज्वला योजनेसाठी असा करा अर्ज
या योजने अतंर्गत कनेक्शन घेण्यासाठी बीपीएल कार्डधारक कुटुंबातील महिला यासाठी अर्ज करु शकते. यासाठी आपल्याला केवायसी फार्म भरून आपल्या जवळील एलपीजी केंद्रात जमा करावा लागेल.
पंतप्रधान उज्ज्वला योजनेचा अर्जासाठी दोन पानांचा अर्ज, आवश्यक कागदपत्रे, नाव, पत्ता, जन धन बँक खाते क्रमांक, आधार नंबर, आदींची आवश्यकता असते. अर्ज करताना आपल्याला सांगावे लागेल की, आपण १४.२ किलोग्रॅमचा सिलेंडर घेणार आहोत की ५ किलोग्रॅमचा.  पंतप्रधान उज्ज्वला योजनेचा अर्ज या योजनेच्या साईटवरुन डाऊनलोड करु शकता.

आवश्यक कागदपत्रे
बीपीएल रेशन कार्ड असणे आवश्यक
फोटो आयडी - आधार कार्ड, मतदान कार्ड
पासपोर्ट साईजचा फोटो
रेशन कार्डची एक झेरॉक्स प्रत
एक प्रतिज्ञापत्र
एलआयसी पॉलिसी, बँक खात्याचा तपशील
बीपीएल मध्ये नाव असलेल्या यादीची एक प्रत.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters