भारत हा कृषिप्रधान देश म्हणून जगात विख्यात आहे, आपल्या देशाची अर्थव्यवस्था कृषी क्षेत्रावर आधारित आहे. देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या ही शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. या महागाईच्या काळात केवळ शेतीवर अवलंबून राहून चालणार नाही त्यासाठी शेतीपूरक व्यवसायाची जोड अत्यावश्यक आहे. आज आपण अशाच चार शेतीपूरक व्यवसायाची माहिती जाणून घेणार आहोत. शेतकरी बांधव आपण या दहा व्यवसाय पैकी कुठलाही एक व्यवसाय सुरू करून लाखो रुपयांची कमाई करू शकता. शेतकरी बांधवांनो जर आपल्याकडे हे शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी पर्याप्त भांडवल उपलब्ध नसेल तर चिंता करू नका या व्यवसायांसाठी केंद्र सरकारच्या मुद्रा लोन या योजनेद्वारे तसेच स्टार्टअप इंडिया या योजनेद्वारे देखील आपणास लोन सहजरीत्या मिळू शकते. चला तर मग शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया या व्यवसायाविषयी सविस्तर माहिती.
फर्टीलायझर डिस्ट्रीब्यूशन
शेतकरी बांधवांनो आपण आपल्या शेतीच्या उद्योगासमवेत फर्टीलायझर डिस्ट्रीब्यूशन हा व्यवसाय देखील सुरू करू शकता. या व्यवसायासाठी आपणास फर्टीलायझर विक्री करण्यासाठी चे लायसन्स प्राप्त करावे लागेल.आपण फक्त फर्टीलायझरच नाही तर वेगवेगळ्या पिकांची बियाणे, वर्मी कंपोस्ट इत्यादी शेतीविषयक उत्पादने विकू शकता. हा व्यवसाय आपण आपल्या राहत्या घरी देखील सुरू करू शकता किंवा आपण आपल्या गावात एखाद्या गाळ्यात या व्यवसायाची सुरुवात करू शकता.
माती परिक्षणाची लॅब
शेतकरी बांधवांनो अलीकडे माती परीक्षण शेतीतुन यशस्वी उत्पादन प्राप्त करण्यासाठी गरजेचे ठरले आहे, मात्र अनेक ठिकाणी अद्यापही माती परीक्षणाच्या लॅब उपलब्ध नाहीत, जर आपल्याकडेही माती परीक्षणाची लॅब नसेल तर आपण आपल्या गावात माती परिक्षणाची लॅब उघडू शकता.
पशुचा चारा विक्री करण्याचा व्यवसाय
कोंबडी, घोडे, डुक्कर, गुरेढोरे आणि शेळ्या यांसारख्या पाळीव प्राण्यांना चारा देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही कृषी उत्पादनाला चारा म्हणतात. तुम्ही या पशु चाऱ्याचा व्यवसाय सुरू करू शकता.
गांडूळ खताचे उत्पादन
सध्या जैविक शेती वर अनेक शेतकरी भर देताना दिसत आहेत. जैविक शेतीसाठी अनेक जैविक खतांची गरज भासत असते, जैविक खतांमध्ये मुख्यता गांडूळ खताचा सामावेश असतो आपण गांडूळ निर्मितीचा प्रकल्प उभारून गांडूळ खत विक्रीतून चांगला नफा कमवू शकता. आपणास यासाठी वर्मी कंपोस्ट कल्चर व्यवस्थितरीत्या शिकून घेणे गरजेचे आहे जर आपण यासाठी प्रतिष्ठित ठिकाणाहून ट्रेनिंग घेतली तर आपण हा व्यवसाय सहजरित्या सुरू करू शकता आणि आपण यातून चांगली मोठी कमाई करू शकता.
Share your comments