Small Business Idea 2022: मित्रांनो जर तुम्ही असा व्यवसाय शोधत असाल, ज्यामध्ये खर्च खूपच कमी आहे आणि कमाई बंपर आहे तर आजची ही बातमी विशेष तुमच्यासाठी. आज आम्ही आपणांस या लेखाच्या माध्यमातून एक भन्नाट व्यवसाय कल्पना तुम्हाला देणार आहोत. मित्रांनो आम्ही आज तुम्हाला मोबाईल अॅक्सेसरीज (Mobile accessories) या व्यवसायाची माहिती देत आहोत. याची मागणी सध्या बाजारात खूपचं वाढली आहे.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा व्यवसाय सीजनरी नसून बारामाही चालणारा आहे. यामुळे या व्यवसायातून (Mobile Business) बारामाही कमाई केली जाऊ शकते. आजच्या या स्मार्टफोनच्या काळात चार्जर, इअरफोन, ब्लूटूथ, पंखा, लाईट, अनेक प्रकारच्या केबल्स, लायटिंग स्पीकर, मोबाईल स्टँड, कार्ड रीडर, साउंडबार स्पीकर अशा अनेक गोष्टी मोबाईलसाठी आल्या आहेत. या उत्पादनांना बाजारात मोठी मागणी आहे. यामुळे जर तुम्ही हा व्यवसाय सुरू केला तर निश्चितच तुम्हाला यातून चांगली बंपर कमाई मिळू शकते.
हेही वाचा
काय सांगता! 'ही' बँक देत आहे मुद्रा लोन; जाणुन घ्या याविषयीं
मोबाईल अॅक्सेसरीजचा व्यवसाय सुरू करताना, आजकाल कोणत्या अॅक्सेसरीजला बाजारात जास्त मागणी आहे याचा सर्वप्रथम मागोवा घ्यावा. त्यानंतरच आवश्यकतेनुसार होलसेल दरात माल खरेदी करा.
तुम्हाला एकाच वेळी अनेक वस्तू खरेदी कराव्या लागतील. वेगवेगळ्या श्रेणीतील वस्तू खरेदी केल्यास त्याचा फायदा ग्राहकांना तसेच तुम्हालाही होईल. त्यांना अनेक श्रेणीतील वस्तू पाहायला मिळतील. यामुळे तुमचा सेल वाढेल. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही सार्वजनिक ठिकाणी छोटासा स्टॉल लावून किंवा सार्वजनिक परिसरात फिरून हा व्यवसाय करू शकता. हा असा व्यवसाय आहे जो अर्धवेळ किंवा पूर्णवेळ करता येऊ शकतो.
या व्यवसायातून किती कमाई होणार - मोबाईल अॅक्सेसरीजचा व्यवसाय हा एक खूप चांगला व्यवसाय आहे. या व्यवसायात तीप्पट नफा सहज मिळू शकतो. समजा तुम्ही एखादी वस्तू 12 रुपयांना विकत घेतली असेल तर तुम्ही ती 50 रुपयांना सहज विकू शकता. ग्राहकही ते आनंदाने खरेदी करतील. याशिवाय या व्यवसायाचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला हवे असल्यास सुरुवातीला 3,000 रुपये गुंतवून देखील तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. उत्पन्न वाढले की त्यात तुम्ही अजून गुंतवणूक वाढवू शकतात.
Share your comments