नवी मुंबई : तुम्ही सुशिक्षित असाल आणि तरीही तुम्हाला नोकरी मिळाली नसेल आणि पैसे कमवायचे असतील तर चिंता करू नका तुम्ही व्यवसाय (Business) सुरु करून चांगली मोठी कमाई करू शकता. मित्रांनो तुम्ही नोकरी न करताही छोटासा व्यवसाय (Business Idea Marathi) सुरु करून चांगले पैसे कमवण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करू शकता, ज्यासाठी तुम्हाला फक्त थोडी मेहनत घ्यावी लागेल.
आपल्या देशात असे अनेक व्यवसाय आहेत, ज्यातून लोक घरी बसून चांगली मोठी कमाई करत आहेत, जे तुम्हीही सुरू करू शकता. व्यवसाय देखील असे आहेत की ज्या व्यवसायात जास्त पैसे गुंतवण्याची अजिबात गरज नाही. आज आम्ही अशाच एका कमी गुंतवणूकीत सुरु करता येणाऱ्या भन्नाट बिझनेसबद्दल सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही लाखोंची कमाई सहज करू शकता. मित्रांनो हिंदू समाजात विवाहित स्त्रिया टिकली लावतात, यामुळे त्याची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असते.
अशा परिस्थितीत जर तुम्ही बिंदी अर्थात टिकली बनवण्याचा व्यवसाय सुरू केला तर खुप चांगली कमाई तुम्ही प्राप्त करू शकता. तुम्ही अतिशय छोट्या मशीनच्या मदतीने बिंदी बनवण्याचा व्यवसाय सुरू करू शकता. सुरुवातीला यासाठी कोणतेही कार्यालय किंवा कारखाना सुरु करण्याची गरज नाही.
याची सुरुवात तुम्ही तुमच्या राहत्या घराच्या एका कोपऱ्यातून सुद्धा करु शकता. बिंदी हा स्त्रियांच्या सोळा श्रृंगारांपैकी एक आहे. पूर्वी फक्त गोल आकाराच्या बिंदीला मागणी होती, पण आता बिंदी विविध आकार आणि डिझाइनमध्ये उपलब्ध आहे. त्यानुसार त्यांच्या किंमती देखील कमी-जास्त बघायला मिळतात.
खरं काय! चंद्रावर शेती करता येणार; चंद्रावरून आणलेल्या मातीत बहरलं रोपटं; वाचा याविषयी
व्यवसायासाठी किती गुंतवणूक करावी लागेल
पूर्वी फक्त विवाहित महिलाच बिंदी लावत असत, पण आता अविवाहित मुलींमध्ये बिंदी लावण्याचा छंद वाढत आहे. परदेशातही स्त्रिया बिंदी लावू लागल्या आहेत. अशा परीस्थितीत त्याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे बिंदी मेकिंग बिजनेस आता झपाट्याने वाढत असून या पासून चांगली बक्कळ कमाई केली जाऊ शकते. मित्रांनो या व्यवसायाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे हा व्यवसाय मात्र 10,000 रुपयांच्या गुंतवणुकीत सुरू करता येतो.
बिंदी तयार करण्यासाठी साहित्य म्हणून मखमली कापडं, चिकट गोंद लागेल. याशिवाय सजावटीच्या साहित्यात दगड, स्फटिक, मोती आवश्यक असतात. तुम्हाला तुमच्या स्थानिक बाजारपेठेत साहित्य आणि पॅकिंग वस्तू सहज मिळतील.
Electric Car: एकदा चार्ज केली की 528 किलोमीटर धावते ही कार; जाणुन घ्या या कारची किंमत आणि फिचर्स
बिंदी कशी बनवायची?
सुरुवातीला डॉट प्रिंटिंग मशीन, डॉट कटर मशीन आणि गमिंग मशीनची आवश्यकता असेल. याशिवाय इलेक्ट्रिक मोटर आणि हँड टूल्स आवश्यक आहेत. त्याच वेळी, कमाईचा विचार केला तर, या व्यवसायातून 50 टक्क्यांहून अधिक नफा मिळतो. जर तुम्ही तुमचे उत्पादन योग्य पद्धतीने विकले तर तुम्ही दरमहा किमान 50 हजार रुपये सहज कमवू शकता.
Share your comments