सिस्टमा बायो इंडिया : बायोगॅस तंत्र

03 March 2019 12:21 PM


भारतातील 70 टक्के ग्रामीण भागातील लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे आज बऱ्याच शेतकऱ्यांना इंधनाचे वाढते दर, विजेची समस्या अशा गोष्टींना सामोरे जावे लागत आहे. परिणामी त्यांच्या शेतमालाच्या उत्पादनावर परिणाम होत आहे यावर सिस्टमा बायो यांच्या द्वारा निर्मित आधुनिक तंत्रज्ञानाने संपन्न बायोगॅस डायजेस्टर हा नक्कीच चांगला पर्याय ठरणार आहे.

दिवसेंदिवस वाढते गॅस सिलेंडरचे दर आणि आणि वीज टंचाईमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी सिस्टमा बायोचा बायो डायजेस्टर (बायोगॅस) संयंत्र हा चांगला पर्याय ठरणार आहे. आज पारंपरिक ऊर्जेचा वापर करणे खूप गरजेचे बनले आहे कारण अपारंपरिक ऊर्जेचे साठे हे हळूहळू मर्यादित होत आहेत तसेच बायोगॅस विषयी असलेल्या माहितीचा अभाव, मार्गदर्शनाची कमतरता तसेच विक्रीपश्चात सेवा या गोष्टींच्या अभावामुळे शेतकरी बांधवांनी बायोगॅस कडे पाठ फिरवल्याचे दृश्य आपणास पहावयास मिळते या सर्व गोष्टींवर मात करण्यासाठी व शेतकऱ्यांना बायोगॅस मध्ये अचूक मार्गदर्शन, नवीन तंत्रज्ञानाने युक्त संयत्र आणि विक्रीपश्चात सेवा देण्यासाठी सिस्टमा बायोने हे पाऊल उचलले आहे.

मूळ मेक्सिको स्थित असलेल्या सिस्टमा बायोने लॅटिन अमेरिका, आफ्रिका याबरोबरच आता भारतामध्ये सुद्धा दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना सेवा देण्याचे काम सुरू केले आहे, उच्च दर्जाचे (2000 जीएसएम LLDPE UPVC) मटेरियल, अखंडित सेवा, तज्ञांचे मार्गदर्शन आणि मोफत जोडणी, शेतकरी बांधवांसाठी सुलभ हप्त्यावर 0% व्याज दराने कर्ज पुरवठा व परतफेडीची सुविधा असे अनेक सेवा सुरु केले आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक तसेच गुजरात या राज्यांमध्ये 500 हुन अधिक समाधानी शेतकऱ्यांना सेवा देण्यात सिस्टमा बायो यशस्वी ठरली आहे, तसेच जागतिक पातळीवर 5,000 हुन अधिक शेतकऱ्यांना सिस्टमा बायोने सेवा पुरवली आहे.

आम्हाला आनंद होतो आहे की आमच्या सांगवी येथील प्रथम फिल्ड ऑफिसच्या बरोबरच आम्ही नारायणगाव, शिरुर तसेच पंढरपूर आणि कर्नाटक मधील मैसुर आणि मांड्या जिल्ह्यात आमचे नविन फिल्ड ऑफिस सुरुवात करीत आहोत. आणि आजपर्यंत जवळपास आमचे 100 बायोडायजेस्टर बारामती, फलटण, महाबळेश्वर, सांगली, सातारा, सोलापूर तसेच नारायणगाव, शिरुर या भागात बसवले आहेत आणि ते यशस्वीपणे कार्यरत आहेत.

पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर तसेच ठाणे जिल्ह्यातील दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकरी बांधवांना सिस्टमा बायो अखंडित सेवा देणार आहे यामुळे शेतकऱ्यांना भेडसावत असलेली इंधन दरवाढ, विजेची समस्या यातून मार्ग काढता येणार आहे तसेच मिळणाऱ्या बायो स्लरीपासून सेंद्रिय शेतीकडे वळण्यास मदत होणार आहे. यामुळे नक्कीच शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणामध्ये सिस्टमा बायोचा मोलाचा वाटा असणार आहे.

सिस्टमा बायोची वैशिष्ट्ये:

  • उच्च दर्जाचे 2000 जीएसएम, LLDPE मटेरियल.
  • जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान ISO Certified.
  • शून्य टक्के व्याज दराने कर्ज पुरवठा व परतफेडीची सुविधा.
  • मोफत जोडणी आणि एक्सेसरीज H2S fillter, प्रेशर वॉल्वह आणि शेगडी.
  • खात्रीशीर विक्री पश्चात्त सेवा.

संपर्क पत्ता:

  1. पुणे कार्यालय: 601, 6 वा मजला, लोहीया जैन गॅलोरे टेक आयटी पार्क, बावधन खुर्द, पुणे-411021.
  2. सांगवी कार्यालय: 1140/1, ऑफिस नं- 2, तलाठी कार्यालय शेजारी, सांगवी, बारामती, पुणे.


विकास गोटे 7620605050
विमल पंजवानी 7620606660

Sistema Bio India सिस्टमा बायो इंडिया बायोगॅस biogas
English Summary: Sistema Bio India : Biogas Technique

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.