देशातील प्रमुख क्रूझ बाईक निर्माती कंपनी रॉयल एनफिल्ड आता इलेक्ट्रिक बाईक बनवण्याच्या दिशेने वाटचाल करत अस्लयाच्या बातम्या मोठ्या वेगाने व्हायरल होतं आहेत. देशातील इलेक्ट्रिक बाईकची वाढती मागणी पाहता रॉयल एनफिल्डने इलेक्ट्रिक क्रूझ बाईक बनवण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी कंपनी 600 कोटींची गुंतवणूक करणार आहे.
अशी चर्चा आहे की रॉयल एनफिल्ड आपली इलेक्ट्रिक बुलेट बाईक भारतीय बाजारपेठेत लॉन्च करू शकते. Royal Enfield आणि Volvo Eicher Commercial Vehicles (VECV) या वर्षी रु. 1,000-1,100 कोटींची गुंतवणूक करणार आहेत, त्यापैकी फक्त Royal Enfield रु. 500-600 कोटी गुंतवणार आहे. रॉयल एनफिल्ड आपली क्षमता, उत्पादने आणि प्रकारांचा समतोल राखण्यासाठी पैसे खर्च करेल.
रॉयल एनफिल्ड कंपनीला परदेशात बाजारपेठ बनवायची आहे
रॉयल एनफिल्ड परदेशातील बाजारपेठांमध्ये आपला व्यवसाय वाढवण्याच्या तयारीत आहे आणि शून्य कार्बन उत्सर्जन वाहनांवर लक्ष केंद्रित करत आहे. रिपोर्टनुसार, आयशर मोटर्सचे सीईओ सिद्धार्थ लाल यांनी सांगितले की, इलेक्ट्रिक वाहनांसाठी इंजिनीअरिंगचे काम सुरू आहे.
रॉयल एनफील्ड इलेक्ट्रिक बाइक कधी लॉन्च होईल?
रॉयल एनफिल्ड कंपनी सध्या तिच्या इलेक्ट्रिक बाइकवर काम करत आहे. त्यासाठी मोठी गुंतवणूकही केली जाणार आहे. पण रॉयल एनफिल्डची इलेक्ट्रिक बाइक तुम्हाला सध्या बाजारात पाहायला मिळणार नाही, कारण ती तयार व्हायला वेळ लागेल. कंपनी आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक बाईकमध्ये कोणताही धोका पत्करू इच्छित नाही.
रॉयल एनफिल्ड शक्तिशाली आणि क्रूझ बाइक्ससाठी ओळखली जाते. अशा परिस्थितीत इलेक्ट्रिक क्रूझ बाइकमध्ये पेट्रोल बुलेटसारखी पॉवर कशी आणता येईल यावर काम सुरू आहे. रॉयल एनफिल्डच्या इलेक्ट्रिक बाइकला बाजारात येण्यासाठी 2 ते 4 वर्षे वाट पाहावी लागेल, असा अंदाज आहे.
Share your comments