1. इतर बातम्या

बॉर्डर सिक्यूरिटी फोर्स: बीएसएफ ने जारी केली भरतीसाठी अधिसूचना

सीमा सुरक्षा बल अर्थात बॉर्डर सेक्युरिटी फॉर्स (BSF) नेत्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर गट C या पदांसाठीच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक असतील अशा उमेदवारांनी 29 डिसेंबर 2021 पूर्वी बॉर्डर सिक्यूरिटी फोर्स च्या अधिकृत संकेतस्थळ rectt.bsf.gov.in यावर अर्ज करायचे आहेत.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
border security force

border security force

 सीमा सुरक्षा बल अर्थात बॉर्डर सेक्युरिटी फॉर्स (BSF) नेत्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर गट C या पदांसाठीच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक असतील अशा उमेदवारांनी 29 डिसेंबर 2021 पूर्वी बॉर्डर सिक्यूरिटी फोर्स च्या अधिकृत संकेतस्थळrectt.bsf.gov.in यावर अर्ज करायचे आहेत.

 बॉर्डर सिक्यूरिटी फोर्स नेजारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ही भरती पात्र  पदांसाठी घेतली जाणार असून यामध्ये HCची 6 पदे,ASIएक जागा आणि हवालदार ( लाईनमन, जनरेटर ऑपरेटर इत्यादी ) 65 पदे रिक्त आहेत.ASI साठी निवड झालेल्या उमेदवारांना सातव्या सी पी सी नुसार 29 हजार 200 रुपये ते 92300 रुपये वेतन श्रेणी दिली जाईल. HCच्या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना पंचवीस हजार पाचशे रुपये वेतन श्रेणी दिली जाईल

कॉन्स्टेबल पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 21 हजार 700 ते 69 हजार शंभर रुपये वेतन दिले जाईल..

 अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 25 वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना  शासकीय नियमानुसार वयात सवलत दिली जाईल. वयोमर्यादेच्या संपूर्ण माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना पहावी.

या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 डिसेंबर 2021 आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना शंभर रुपये फीज भरावी लागेल. महिला उमेदवार, अनुसूचित जाती – जमाती आदींना अर्ज शुल्कात  सूट देण्यात आली आहे.( संदर्भ – सकाळ)

English Summary: recruitment in border security force for 72 vacancy Published on: 04 December 2021, 10:28 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters