1. इतर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर खासगी रोपवाटिका योजना; जाणून योजनेची सर्व माहिती

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर खासगी रोपवाटिका योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर खासगी रोपवाटिका योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर खासगी रोपवाटिका योजना (Seedling Nursery Scheme Maharashtra) ही भाजीपाला उत्पादनाला प्रोत्साहन देऊन शेतक-यांचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने जाहीर करण्यात आली आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर खासगी रोपवाटिका योजनेचे स्वरुप

 • महाराष्ट्रत मोठया प्रमाणात फळे व भाजीपाला पिकांचे व्यवसायिक पध्दतीने लागवड करुन उत्पादन घेतले जाते.
 • फळे व भाजीपाला निर्यातही मोठया प्रमाणात करण्यात येते.
 • मागील २ ते ३ वर्षापासून भाजीपाला पिकाचे निर्यातक्षम व विषमुक्त उत्पादन करण्याकडे शेतक-यांचा कल वाढत आहे. त्यामुळे भाजीपाला बियांण्याच्या
 • चांगल्या जाती व चांगली रोपे यांची मागणी वाढत आहे.
 • भाजीपाला रोपांची नियंत्रीत वातावरणामध्ये तयार झालेली किड व रोगमुक्त भाजीपाला रोपांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे.त्यामुळे राज्यातील प्रत्येक तालुक्‍यात दर्जेदार किड व रोग मुक्‍त रोपे तयार करणाऱ्या लहान रोपवाटिका उभारण्यास वाव आहे.

काय आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर खासगी रोपवाटिका योजनेचे उद्देश्य -Seedling Nursery Scheme Maharashtra

 • भाजीपाला पिकांची दर्जेदार व किडरोग मुक्‍त रोपे निर्मिती करुन उत्पन्न व उत्पादनात वाढ करणे.
 • रोपवाटिकेमुळे स्थानिक शेतक-यांना शेतीपुरक व्यवसायाची संधी उपलब्ध करुन देणे.
 • पिक रचनेत बदल घडवून आणणे व नविन तंत्रज्ञानाचा वापर करणे.
 • शेतक-यांचे आर्थिक उत्पन्न व भाजीपाला उत्पादनात वाढ करणे.

योजनेची व्याप्ती

पॉलीनेट –

भाजीपाला रोपवाटिकेत बियाण्याची रुजवण करण्यासाठी आर्द्रता व तापमान यांचे संतुलन राखणे आवश्यक असते. यासाठी बियाण्याची रुजवण वर्षभर करण्यासाठी प्लॅस्टीक टनेल्स रोपवाटिकेतील अत्यावश्यक बाब आहे
शेडनेट –
बियाण्याची रुजवण झाल्यानंतर विक्रीयोग्य होण्याच्या कालावधीत रोपांना कठीणपणा (हार्डनिंग’ आणणेसाठी ५ ते ६ दिवसाची पॉलीटनेलमधील रोपे शेडनेटमध्ये ठेवणे आवश्यक असते. सर्वसाधारणपणे ५० % सुर्यप्रकाश व ५० % सावली रोपांना उपलब्ध होणारे शेडनेट वापरण्यात येते. जेणेकरुन रोपे २१ दिवसापर्यंत खुल्या वातावरणात आणता येतील.
तसेच रोपे शेडनेटमध्ये वाढताना त्यांचे किड व रोगापासून संरक्षण होईल तसेच खत व पाणी व्यवस्थापन झाल्याने दर्जेदार रोपे उत्पादन करता येईल.
प्लॅस्टीक क्रेटस :

रोपांची वाहतुक सुरक्षित करण्यासाठी प्लॅस्टिक क्रेटस प्रस्तावित करण्यात आलेली आहेत.

 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर खासगी रोपवाटिका योजनेचे लाभार्थी (Ahilya Devi Seedling Nursery Scheme Maharashtra)निवडीचे निकष

 • अर्जदाराकडे स्वत:च्या मालकीची किमान ०.४० हे. (१ एकर) जमिन असणे आवश्यक आहे.
 • रोपवाटिका उभारण्यासाठी पाण्याची कायमची सोय असणे आवश्यक आहे.
 • माहिला कृषी पदवी धारकांना प्रथम प्राधान्य राहील.
 • महिला गटास द्वितीय प्राधान्य.
 • भाजीपाला उत्पादक अल्प व अत्यअल्प भूधारक शेतकरी व होतकरी गट यांना प्राधान्य.
 • अनुसुचित जाती व जमाती यांना केंद्र सरकारच्या मापदंडा प्रमाणे लाभ देण्यात येईल.

रोपवाटिकांचा संभावीत वापर

भाजीपाला पिके -टोमेंटो,वांगी,हिरवी मिरची,कोबी, फुलकोबी, शिमला मिरची, कांदा, इत्यादी व इतर पिके
फळपिके- पपई, ऱोवगा इत्यादी.

योजंनेअंतर्गत तांत्रिक प्रशिक्षण

भाजीपाला रोपवाटिकांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या होतक-यांना ३ ते ५ दिवसांचे तांत्रिक प्रशिक्षण हॉर्टीकल्चर ट्रेनिंग सेंटर, तळेगाव दाभाडे किंवा कृषि विज्ञान केंद्र, बारामती येथे अनिवार्य राहील.

 

अर्थसहाय्याचे स्वरुप :-

 • सदर प्रकल्प राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाच्या धर्तीवर राबविण्यात येईल.
 • सदर योजनेअंतर्गत प्रकल्प उभारणीनंतर प्रथम हप्ता ६०% व उर्वरित द्वितीय हप्ता ४०% अनुदान

योजनेचा कालावधी -

सदर योजनेचा कालावधी २ वर्षाचा राहील. (सन २०२०-२१ व २०२१-२२) योजनेची अंमलबजावणी -जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांचेमार्फत सदरची योजना राबविण्यात येईल.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters