1. इतर बातम्या

पंतप्रधान कृषी सिंचन योजना : शेतकर्‍यांना कसा मिळतो लाभ, अनुदानबाबत काय आहेत नियम?

केंद्र सरकारने शेतकर्‍यांच्या हितासाठी अनेक योजना चालवल्या आहेत. या योजनांपैकी एक म्हणजे पंतप्रधान कृषी सिंचन योजना. पंतप्रधान कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पादन वाढीस मदत करण्याबरोबरच पर्यावरणाची विशेष काळजी घेतली जाते. तसेच शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव
पंतप्रधान कृषी सिंचन योजना

पंतप्रधान कृषी सिंचन योजना

केंद्र सरकारने शेतकर्‍यांच्या हितासाठी अनेक योजना चालवल्या आहेत. या योजनांपैकी एक म्हणजे पंतप्रधान कृषी सिंचन योजना. पंतप्रधान कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पादन वाढीस मदत करण्याबरोबरच पर्यावरणाची विशेष काळजी घेतली जाते. तसेच शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते.

म्हणजेच योजनेतून शेतकऱ्यांना अनेक प्रकारे मदत केली जाते. आपण या लेखात या योजनेविषयी माहिती घेणार आहोत. शेतकऱ्यांना याचा कसा फायदा होतो. तसेच या खास योजनेचा फायदा कोणते शेतकरी घेऊ शकतात आणि कोणत्या प्रक्रियेद्वारे शेतकरी बंधू सिंचनासाठी सरकारकडून अनुदान घेऊ शकतात.

काय आहे ही योजना?

केंद्राने शेतीला पाणी देण्याच्या उद्देशाने पंतप्रधान कृषी सिंचन योजना सुरू केली आहे. त्याअंतर्गत देशातील प्रत्येक जिल्ह्यातील सर्व शेतात सिंचनासाठी पाणी देण्याची योजना आहे. या योजनेत शासनाच्या वतीने नवीन जलस्रोत तयार करणे, जलसाठा, भूजल विकास आदी कामे केली जातील. तसेच या योजनेत सिंचन उपकरणे व योजनांवर सरकारकडून भरीव अनुदान दिले जात आहे, ज्यात प्रत्येकजण पाणी, खर्च आणि कष्टांची बचत करतो. सरळ शब्दांत सांगायचे तर, आपण नवीन मार्गाने सिंचन केले तर सरकार शेतकऱ्यांना त्याची उपकरणे खरेदी करण्यात मदत करते. या योजनेतून ठिबक सिंचन, स्प्रिंकलर सिंचन इत्यादींना प्रोत्साहन दिले जात आहे. तसेच प्रत्येक पिकाच्या आधारे सिंचनाचा सल्ला दिला जात आहे, जेणेकरून केवळ पाण्याची बचत होणार नाही तर उत्पादनही वाढू शकेल. योग्य वेळेत सिंचन न झाल्यास शेतकऱ्यांच्या पिकावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो.

 

कोणत्या शेतकऱ्यांना फायदा होईल?

या योजनेत ज्या शेतकऱ्यांकडे स्वतःची शेती व पाण्याचे स्त्रोत आहेत अशा शेतकर्‍यांना लाभ देण्यात येत आहे. तसेच या योजनेचा लाभ त्या शेतकऱ्यांना देण्यात येत आहे जे कंत्राटी शेती करीत आहेत आणि सहकारी सदस्य, बचत गटांनाही लाभ देण्यात येत आहे.

 

कसा मिळेल फायदा?

यासाठी तुम्हाला योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी लागेल आणि आधार कार्ड, खतौनी इत्यादींची माहिती द्यावी लागेल. तसेच या योजनेत शासनाकडून 80 ते 90 टक्के अनुदान सिंचन उपकरणावर दिले जाते.

English Summary: Prime Minister's Agricultural Irrigation Scheme: How do farmers get benefits and what are the rules regarding subsidy? Published on: 14 May 2021, 02:29 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters