1. इतर बातम्या

प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून मिळवा १० लाख रुपयापर्यंतचे कर्ज; वाढवा आपला व्यवसाय

पंतप्रधान मुद्रा योजना किंवा पीएमएमवाय ही योजना ८ एप्रिल २०१५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सुरू करण्यात आली होती. बिगर कॉर्पोरेट, बिगर-शेती लघु / सूक्ष्म उद्योगांना १० लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करण्यासाठी पंतप्रधान मुद्रा योजना सुरू केली गेली.

KJ Staff
KJ Staff


पंतप्रधान मुद्रा योजना किंवा पीएमएमवाय ही योजना ८ एप्रिल २०१५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सुरू करण्यात आली होती.  बिगर कॉर्पोरेट, बिगर-शेती लघु / सूक्ष्म उद्योगांना १० लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करण्यासाठी पंतप्रधान मुद्रा योजना सुरू केली गेली. या कर्जांना पीएमएमवाय अंतर्गत मुद्राचे कर्ज म्हटले जाते. वाणिज्य बँका, लघु वित्त बँका, आरआरबीज एमएफआय आणि एनबीएफसीकडून या योजनेसाठी कर्ज दिली जातात. 

कर्जदार वर नमूद केलेल्या कोणत्याही कर्ज देणार्‍या संस्थांशी थेट संपर्क साधू शकतो. किंवा ऑनलाईन पद्धतीनेही यासाठी कर्जासाठी अर्ज करु शकतो. @ www.udyamimitra.in  पीएम मुद्रा योजनेच्या अंतर्गत, मुद्रा, लाभार्थी सूक्ष्म युनिट किंवा उद्योजकांच्या वाढीची किंवा विकासाची आणि अर्थसहाय्याच्या अवस्थेला सूचित करण्यासाठी 'शिशु', 'किशोर' आणि 'तरुण' नावाची तीन उत्पादने तयार केली आहेत.

शिशुः पीएमएमवाय अंतर्गत  ५०,०००  / - पर्यंतचे कर्ज दिली जातात.

किशोर- पीएमएमवायच्या अंतर्गत ५० हजार ते ५ लाखापर्यंतचे कर्ज यातून दिले जाते.

तरुण - पीएम मुद्रा योजनेतून या कक्षात साधारण ५ लाख ते १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते.  पीएमएमवायचे उद्दीष्ट नवीन पिढीच्या इच्छुक तरुणांमध्ये उद्योजकतेला प्रोत्साहन देणे आहे. शिशु श्रेणी युनिट्स आणि नंतर किशोर आणि तरुण प्रवर्गात अधिक लक्ष देण्यात येईल याची खात्री आहे. लहान उद्य़ोजक, सुक्ष्म उद्योग याच्या विकासासाठी हे शिशु, तरुण, किशोर हे चरण निर्माण केली आहेत.

English Summary: Pradhan Mantri MUDRA Yojana Offers Loans Up to 10 Lakh Published on: 29 April 2020, 03:09 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters