1. इतर

पोस्ट ऑफिसची घ्या फ्रेंचाइजी; निवडा बक्कळ कमाईचा मार्ग


भारत लोकसंख्येच्या मानाने सर्वात मोठा देश आहे. आपल्या देशातील टपाल सेवाही जगातील सर्वात मोठी टपाल सेवा आहे. आजही अनेक भागात टपाल सेवेची कमी आहे.  हे कमी भरुन काढण्यासाठी  पोस्टल विभाग पोस्ट ऑफिसची फ्रेंचाइजी सुरू करण्याची संधी देत आहे. जर आपण आपला व्यवसाय सुरू करायचा म्हणून विचार करत असाल तर ही संधी तुम्ही दडवू नका. पोस्ट ऑफिसच्या फ्रेंचाइजीमध्ये दोन प्रकार आहेत. पहली आऊटलेट फ्रेंचाइजी आणि दुसरी पोस्टल एजंटची फ्रेंचाईजी. यासाठी अर्ज करणाऱ्यांचे वय हे १८ वर्ष पूर्ण असले पाहिजे.

 फ्रेंचाइचीसाठी किती येतो खर्च

यासाठी आपल्याला ५ हजार रुपयांचा खर्च येतो. सिक्यॉरिटी डिपॉझिटच्या रुपाने ही रक्कम घेतली जाते. यानंतर आपल्याला आपल्या परिसराचा स्टॉम्प, स्टेशनरी, स्पीड पोस्ट, मनी ऑर्डर सारख्या सेवा उपलब्ध कराव्या लागतील. आपल्या कामानुसार, दुसरे निश्चित केल्याप्रमाणे आपले कमीशन निश्चित केले जाते. म्हणजेच आऊटलेट सुरू केल्यानंतर फ्रेंचाइजी मालकाच्या कमीशन रुपात ही कमाई होत असते.

कसे कराल अर्ज

https://www.indiapost.gov.in/VAS/DOP_PDFFiles/Framchise.pdf  या संकेतस्थळावर जाऊन आपण अर्ज डाऊनलोड करू शकता. अर्जामधील माहिती भरल्यानंतर तो अर्ज पोस्ट विभागात जमा करावा लागतो.  जर आपण या योजनेसाठी योग्य असाल तर टपाल विभाग किंवा डाक विभाग आपल्या मध्ये एक एमओयूवर स्वाक्षरी करतील त्यानंतर आपण फ्रेंचाइजी मिळवू शकाल.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters