पीएनबीच्या मदतीने महिलाही होणार उद्योजक ; आर्थिक मदतीने सुरू करा आपला व्यवसाय

02 June 2020 06:03 PM By: भरत भास्कर जाधव

 

पंजाब नॅशनल बँक महिला उद्योजकांसाठी (Women Entrepreneurs) एक योजना राबवत आहे. या योजनेतून महिलांना आर्थिक साहाय्य दिले जाते. या योजनेचे नाव महिला उद्यम निधी स्कीम (Mahila Udyam Nidhi Scheme)  आहे. महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि महिलांना व्यापार सुरू करण्यासाठी या योजनेतून मदत केली जाते. मिळणाऱ्या या आर्थिक साहाय्याने आपण मॅन्यूफॅक्चरिंग आणि उत्पादन करण्याचे उद्योग सुरू करू शकतो. या योजनेंतर्गंत मिळणाऱ्या कर्जासाठी कोणतीच सिक्योरिटी द्यावी लागत नाही.

दरम्यान आपल्याला याविषयी अधिकची माहिती हवी असेल तर आपण पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत जाऊन याची सविस्तर माहिती घेऊ शकता. किंवा आपण बँकेच्या https://www.pnbindia.in/schemes-for-women.html या संकेस्थळावर जाणून माहिती मिळवू शकता. या योजनेतून महिलांना आर्थिक मदत केली जाते, जेणेकरून या मदतीतून महिला आपला व्यवसाय वाढवू शकतील.ज्या महिलांनी नवीनच MSME ची सुरुवात केली आहे. किंवा आधीपासून एमएसएमई चालवत असतील अशा महिलांना हे कर्ज मिळणार आहे. या योजनेच्या साहाय्याने महिला ऑटो दुरुस्ती, सर्व्हिस सेंटर, ब्युटी पार्लर, केबल टीवी नेटवर्क, कॅन्टीन, किंवा रेस्टोरॅन्ट, सायबर कॅफे, फोनबुथ, लॉन्ड्री, मोबाईल दुरुस्ती, फोटो स्टुडिओ,  टीव्ही दुरुस्ती, रोड ट्रांसपोर्ट ऑपरेटर, सलून, कृषी साधनांचे दुकान किंवा दुरुस्ती केंद्रे, ट्रेलरिंग, टायपिंग मशीन आदींचे काम करु शकतील.

pnb Women Entrepreneurs Mahila Udyam Nidhi Scheme MSME महिला उद्योजक महिला उद्यम निधी स्कीम पीएनबी पंजाब नॅशनल बँक
English Summary: pnb help women for become entrepreneurs, with economical aid start your business

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.