1. इतर

PM Kishan Samman Nidhi Yojana : जाणून घ्या… ऑनलाईन यादीत कसे चेक कराल तुमचे नाव

KJ Maharashtra
KJ Maharashtra
पंतप्रधान किसान सन्मान निधी  योजना

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना

पंतप्रधान किसान सन्मान निधीशी संबंधित शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकार पुढील हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार सरकार ऑगस्ट महिन्यात 9 वा हप्ता हस्तांतरित करू शकते.

शेतकर्‍याला आर्थिक मदत मिळावी आणि उत्पादन वाढविण्यात मदत व्हावी यासाठी सरकार अनेक योजना राबवित आहे. याच उद्देशाने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकारने २०१८ मध्ये सुरू केली होती. या योजनेंतर्गत वर्षामध्ये तीनवेळा २-२ हजार रुपयांचे हप्ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. या योजनेंतर्गत निवडलेल्या शेतकऱ्यांना वार्षिक ६,००० रुपये ( तीन हप्त्यांमध्ये) देण्याची तरतूद आहे. त्याअंतर्गत पैसे थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा कले जातात. पंतप्रधान किसान योजनेसाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्यापासून ते सर्व माहिती अधिकृत संकेतस्थळ pmkisan.gov.in वर देण्यात आली आहे.

हेही वाचा : सरकारचे पी एम किसान एफपीओ योजना, तुम्हाला देखील करता येईल अर्ज

अशी करा नोंदणी :

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी अद्याप नोंदणी न केलेले शेतकरी अद्याप अर्ज करू शकतात. अशा परिस्थितीत पुढील महिन्यात त्यांना हप्ता मिळेल. यासाठी प्रथम आपल्याला pmkisan.gov.in या संकेतस्थळावर जावे लागेल. Farmer Corner या पर्यायावर क्लिक केल्यावर New Farmer Registration पर्याय येईल. आपण येथे विचारलेल्या सर्व माहिती भरून स्वत: ची नोंदणी करू शकता. नोंदणी झाल्यानंतर पुढील हप्ता केंद्र सरकार थेट तुमच्या बँक खात्यात पाठवेल.

 

असे चेक करा यादीत नाव :

यासाठी तुम्हाला आधी वेबसाइट pmkisan.gov.in वर जावे लागेल. मग Farmer Corner पर्यायावर क्लिक करा. Farmer Corner वर जाऊन लाभार्थ्यांच्या यादीवर क्लिक केल्यावर एक नवीन पृष्ठ उघडेल. तेथे तहसील आणि ब्लॉक निवडल्यानंतर आपण आपले नाव सूचीमध्ये शोधू शकता.

प्रतिनिधी- गोपाल उगले

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters