1. इतर

पीएम किसानचे दोन हजार रुपये लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा

KJ Maharashtra
KJ Maharashtra
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी

केंद्र सरकार (Central Government )ची महत्त्वाकांक्षी योजना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (Pradhanmantri kisan sanman nidhi yojana ) योजनेच्या आठव्या हप्त्याचे दोन हजार रुपये लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहेत, मात्र अद्याप याच्या तारखेबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. एप्रिल अखेरपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपयांचा हप्ता जमा होईल, असे केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी (Union Minister of State for Agriculture Kailash Chaudhary) यांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार सरकार 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 20 हजार कोटी रुपये जाहीर करेल. कृषी मंत्रालय (Agriculture Ministry) आणि आपल्या वतीने याबाबतची सगळी कामे पूर्ण केली आहेत. पंतप्रधानांचा कार्यक्रम घेण्यास उशीर झाला आहे. या योजनेअंतर्गत वर्षाकाठी 65 हजार कोटी रुपयांचे बजेट आहे. 25 डिसेंबर 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकाच वेळी नऊ कोटी शेतकऱ्यांसाठी पैसे जाहीर केले. इतर लोकांचे व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर पैसे पाठवण्यात आले.

 

कोणाला मिळणार या निधीअंतर्गत पैसे

पंतप्रधान किसान सन्मान निधी अंतर्गत हा त्याचा लाभ घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या नियमानुसार शेतकऱ्यांच्या नावे शेती असणे आवश्यक आहे. तसेच जमीन जर शेतकऱ्याच्या आजोबा किंवा वडिलांच्या नावावर असेल तर योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच या योजनेत आयकर विवरणपत्र भरणारे,  डॉक्टर, वकील आदिना योजनेतून वगळण्यात आले आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना साठीतुम्ही घर नोंदणी करू शकतात.

 

या योजनेत नाव नोंदणी करण्यासाठी तीन पर्याय

  • या योजनेअंतर्गत नाव नोंदवण्यासाठी शेतकरी आपली कागदपत्र गावातील तलाठी कार्यालयात जमा करू शकता. त्यासाठी आधार कार्ड आणि बॅंक पासबुक ची झेरॉक्स लागते.
  • सीएससी म्हणजेच कॉमन सर्विस सेंटर ही शेतकरी नावाची नोंदणी करू शकते. मात्र येथे नोंदणी करायचे असल्यास त्यासाठी ठराविक शुल्क आकारले जाते.
  • शेतकरी स्वतः पी एम किसान पोर्टल वर जाऊन नाव नोंदणी करू शकतात. किंवा आधी असलेल्या माहितीत बदल करू शकता.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters