PM KISAN YOJNA: नोव्हेंबरपर्यंत येईल पैसा; वेळे असपेर्यंत करा 'या' गोष्टी करा नाहीतर..

05 September 2020 05:05 PM By: भरत भास्कर जाधव


मोदी सरकारची सर्वात लोकप्रिय झालेली पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता आला आहे. साधरण ३० लाख शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांचा हप्ता टाकण्यात आला आहे. पीएम किसान योनजेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची मदत केली जाते. दरम्यान या योजनेचा सहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात आला आहे.  पण जर तुमच्या अर्जात काही त्रुटी असतील तर आपल्या खात्यात पैसे येणार नाही. अनेक शेतकऱ्यांच्या अर्जात गडबड असल्याने दोन हजार रुपयांचा हप्ता आलेला नाही. 

अनेक लाभार्थी आपला आधार कार्ड बँकेच्या खात्यासी लिंक करत नाहीत यामुळे त्यांच्या खात्यात पैसा आलेला नाही. याशिवाय अर्ज भरताना आपला आधार कार्ड, बँकेचा खातेक्रमांक व्यवस्थित नोंदवावा. जर यात काही चुकी झाल्यास येणारा पैसा हा बँकेत अडकून पडतो. बऱ्याच वेळा आपल्या नावाची स्पेलिंग चुकीची राहिल्यास म्हणजे आपल्या नावातील कोणते अक्षर चुकत असते. ही चुकी नेहमी आधार कार्ड, आणि अर्ज भरताना होत असते. तर पीएम किसान योजनेच्या अर्ज भरताना नाव चुकल्यास पैसा मिळणार नाही. यामुळे आधार कार्ड, बँकेतील पासबुक, अर्जावर आपले नाव हे समान असल्याची खात्री करावी.  जर अधिक चुकी असेल तर कृषी अधिकाऱ्याशी संपर्क करावा.

आधार कार्ड कसा करणार अपडेट 

PM-Kisan Scheme च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन(https://pmkisan.gov.in/) यातील फार्मर कॉर्नरच्या आत जाऊन Edit Aadhaar Details पर्यायावर क्लिक करावे. येथे आपला आधार क्रमांक नोंदवा लागेल. त्यानंतर कॅप्चा कोड टाकून सबमिट करावे.

कधी येतो प्रधानमंत्री किसान योजनेचा पैसा

पीएम किसान योजनेचा पहिला हप्ता हा १ डिसेंबर ते ३१ मार्चदरम्यान येत असतो. दुसरा हप्ता हा १ एप्रिल ते ३१ जुलैच्या दरम्यान येत असतो. आणि तिसरा हप्ता हा १ ऑगस्ट ते ३० नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येत असतात. म्हणजे काय एकाच दिवशी सर्व लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकले जात नाहीत. या योजनेचे लाभार्थी कोट्यवधी शेतकरी आहेत, यामुळे पैसे हस्तांतरण करण्यास वेळ लागत असतो.

पीएम किसान योजनेच्या अर्जाची स्थिती

जर आपल्या अर्जाची स्थिती पाहायची असेल किंवा आपला अर्ज मंजूर झाला आहे किंवा नाही यासाठी आपण ऑनलाईन अर्जाची स्थिती चेक करु शकतात. आपल्याला सकारने दिलेल्या www.pmkisan.gov.in यावर जावे लागेल. 

PM KISAN YOJNA PM Kisan पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना मोदी सरकार modi government pradhanmantri kisan samman nidhi पीएम-किसान प्रधानमंत्री किसान सन्मान निधी
English Summary: PM KISAN YOJNA: Money will come by November, do 'these' things till the time is up, otherwise ..

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.