1. इतर बातम्या

पीएम किसान योजनेचा घोळ : कोणी लाटला मृत शेतकऱ्यांचा पैसा तर कोणी आहे प्राप्तीकर भरणारे धनी

मोदी सरकारची पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना ही खूप लोकप्रिय झालेली आहे. परंतु सध्या ही योजना घोटाळ्यामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. तामिळनाडू, उत्तरप्रदेश आणि इतर राज्यांसह महाराष्ट्रातही या योजनेतील घोटाळ्याचं लोणं पसरलं आहे.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


मोदी सरकारची पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना ही खूप लोकप्रिय झालेली आहे. परंतु सध्या ही योजना  घोटाळ्यामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. तामिळनाडू, उत्तरप्रदेश आणि इतर राज्यांसह महाराष्ट्रातही या योजनेतील घोटाळ्याचं लोणं पसरलं आहे. बनावट लाभार्थ्यांनी या योजनेतून लाखो रुपयांचा पैसा लाटला आहे. दरम्यान या योजनेच्या माध्यमातून सरकार अल्प भूधारकांना वर्षाला ६ हजार रुपयांची मदत करत असते. कुटुंबातील पती, पत्नी व १८ वर्षाखालील अपत्यांपैकी एकालाच या योजनेला लाभ देण्यात येतो. मात्र अपात्र ठरलेली अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेत असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे.  इतकेच काय जे शेतकरी प्राप्तिकर भरत होते तेही या योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आले आहे. याचबरोबर अनेकजांनी मृत झालेल्या शेतकऱ्यांच्या नावावरही पैसा लाटल्याचे निष्पन्न झाले आहे. अशा अपात्र लाभार्थ्यांना नोटिसा देण्यात आल्या असून त्यांच्याकडून निधी वसूल केला जात आहे.

हेही वाचा: पंतप्रधान पीक विमा योजनेचा अर्ज करताय का ? 'या' गोष्टींची घ्या काळजी

दरम्यान राज्यात २३ ऑक्टोबरपर्यंत ३७२ शेतकऱ्यांकडून  एक हजार ६१८ हप्त्यांची ३३ लाख ८० हजार रुपयांची वसूली केली आहे. यात प्राप्तिकर भरणाऱ्या २६४ शेतकऱ्यांकडून २४ लाख ८४ हजारांची वसूली झाली. यात औरंगाबाद जिल्ह्यातील २५३ शेतकऱ्यांकडून २३ लाख ७२ हजार, नाशिकच्या ११ शेतकऱ्यांकडून १ लाख १२ हजार, अन्य १०८ शेतकऱ्यांकडून ८ लाख ९६ हजार रुपयांची वसूली झाली आहे.

 


प्राप्तिकर भरणाऱ्या दोन लाख ३० हजार २८२ शेतकऱ्यांकडून त्यांनी घेतलेल्या २०८ कोटी ५० लाख ९० हजार रुपयांची वसुली केली जाणार आहे. यात सर्वाधिक १९ हजार शेतकरी हे सातारा जिल्ह्यातील असून त्यांत्याकडून १७ कोटी ४४ लाखांची वसूल होईल. तर नगर जिल्ह्यातील १९ हजार ८९०, पुणे १० जळगाव १३ हजार ९४२, सोलापूर १३ हजार ७९३, कोल्हापूर येथील १३ हजार ७९१, सांगली १३ हजार ६१, नाशिक १२ हजार ५४ शेतकऱ्यांकडून वसूली होणार आहे. सर्वात कमी ७७१ शेतकरी गडचिरोली जिल्ह्यातील असून त्यांच्याकडून ७४ लाखांची वसूली होईल. तर अन्य जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या १ ते ८ हजारांच्या आसपास आहे.

एकाच कुटुंबातील अनेकांनी घेतला लाभ -

नगर जिल्ह्यातील अनोखा प्रकार समोर आला आहे. एका कुटुंबातील अनेकांकडून लाभ घेतला आहे. नावावर शेती नसणे व अन्य कारणांमुळे राज्यातील १ लाख ७ हजार शेतकरी अपात्र ठरले आहेत. या शेतकऱ्यांनी उचलेल्या २ लाख १३ हजार ५०५ हप्त्यांची ४२ कोटी ७० लाख १० हजार रुपये निधीची वसुली होणार आहे. यात नगर जिल्ह्यातील १९ हजार ४०१ शेतकरी जिल्ह्यातील असून त्यांच्याकडून ८ कोटी ९ लाख रुपयांची वसूली केली जाणार आहे. त्यानंतर यवतमाळचा क्रमांक लागत असून ८ हजार ६०५ शेतकऱ्यांकडून चार कोटी ९५ लाखांची वसुली होईल.

सांगली जिल्ह्यातील ४ लाख ५८ हजार १९० लाभार्थ्यांची नोंद आहे. यापैकी १ हजार ६६० अपात्र शेतकरी आहेत. तर १२ हजार ६०७ जण आयकर भरणारे अपात्र शेतकरी आहेत.  अशा १४ हजार २६७ बोगस लाभार्थ्यांची यादी सरककारने पोर्टलवर जाहीर केली आहे. दरम्यान या सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर सरकारकडून ११ कोटी ३५ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. दरम्यान ही रक्कम संबंधित व्यक्तींकडून वसूल केली जाणार आहे,  अशा प्रकारच्या नोटिसा अपात्र लाभार्थ्यांना पाठविले जात आहेत.

 

English Summary: Pm kisan scheme : tax payer farmer take benefit of pm kisan scheme Published on: 29 October 2020, 05:55 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters