1. इतर बातम्या

Pm - Kisan Scheme : पुढच्या महिन्यात येतील पीएम किसान योजनेचे पैसे; आता १० कोटी लोक घेतायत लाभ

पीएम किसान सम्मान निधी योजनेच्या अंतर्गत मोदी सरकारने मंगळवारी नवा विक्रम बनवला आहे. या योजनेच्या अंतर्गत १० कोटी लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. सरकारला अजून फक्त ४.५ कोटी शेतकऱ्यांना या फायदा पोचवायचा आहे.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


पीएम किसान सम्मान निधी योजनेच्या अंतर्गत मोदी सरकारने मंगळवारी नवा विक्रम बनवला आहे. या योजनेच्या अंतर्गत १० कोटी लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. सरकारला अजून फक्त  ४.५ कोटी शेतकऱ्यांना या फायदा पोचवायचा आहे.  या योजनेच्या अंतर्गत उत्तर प्रदेशातील सर्वात जास्त २ कोटी ३० लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसा टाकला जाणार आहे.   या योजनेत नोंदणी असलेल्या शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये मिळणार आहेत. केंद्रिय कृषी राज्य मंत्री कैलाश चौधरी यांच्या मते ही योजना शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास उपयुक्त आहे.

या योजनेच्या पुढील हप्ता हा १ ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दिवशी येईल असा सांगण्यात येत आहे. जर आपण शिल्लक असलेल्या ४.५ कोटीमधील असाल आणि आपल्याला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. त्यासाठी आपण ऑनलाईन अर्ज देखील केला आहे तर तुम्ही पीएम किसान हेल्पलाईन नंबर ०११-२४३००६०६ वर संपर्क करुन आपल्या अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकता. जर एखाद्या शेतकऱ्यांना काही अडचण असेल तर ते थेट कृषी मंत्रालयाच्या फोन नंबरवर संपर्क करु शकता, असं मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.  जर आपल्याला पीएम किसान सन्मान निधीचा लाभ नाही मिळाला असेल तर आपल्या आधार कार्ड किंवा बँक अकाउंट आणि इतर कागदावर नावाची स्पेलिंगमध्ये अंतर असेल किंवा चुकी असेल. नावात चुकी असल्यामुळे बहुतेक लोकांच्या खात्यात पैसे आले नाहीत.

जर असे काही असेल त्या चुका दुरुस्त करा. ह्या चुका आपण घरी बसूनही दुरुस्त करु शकता. PM-Kisan Scheme च्या अधिकृत संकेतस्थळावर (https://pmkisan.gov.in/) जा. यात फार्मर कॉनरच्या आत जाऊन Edit Aadhaar Detail या पर्यायावर क्लिक करा.  येथे आपला आधार नंबर टाका.  यानंतर एक कॅप्चा कोड टाकून सबमिट करा. जर आपले नाव चुकी आहेचा म्हणजेच अर्जावरीत आणि आधारवर आपले नाव वेगवेगळे आहे. ते हे आपण ऑनलाईनने घरी बसून निट करू शकतो. जर अजून दुसरी चुकी असेल तर आपण कृषी विभागाच्या कार्यालयात संपर्क करावा.

English Summary: PM - Kisan Scheme : farmer will get money in next month ; 10 crore beneficiaries taking benefit Published on: 09 July 2020, 04:15 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters