1. इतर बातम्या

PM Kisan Scheme :शेतकऱ्यांना वर्षाला भेटणार १५ हजार रुपये ?

कोविड-१९ सारख्या संकटाच्या काळात केंद्र सरकार विविध योजनातून शेतकऱ्यांना दिलासा देत आहे. शेतकऱ्यांचे हित जपण्याचे काम सरकार सातत्याने करत आहे. शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जाऊ लागू नये, यासाठी सरकारने शेतकरी सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य करण्यात आले.

KJ Staff
KJ Staff


कोविड-१९ सारख्या संकटाच्या काळात केंद्र सरकार विविध योजनातून शेतकऱ्यांना दिलासा देत आहे.  शेतकऱ्यांचे हित जपण्याचे काम सरकार सातत्याने करत आहे. शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागून नये,  यासाठी सरकारने  शेतकरी सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य करण्यात आले.  शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असलेली ही योजना पंतप्रधान मोदींनी २०१९ मध्ये सुरु केली होती.  सरकार दर वर्षाला शेतकऱ्यांना मदत म्हणून ६ हजार रुपये देत असून शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात पैसे टाकत असते.

दरम्यान सरकार शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्याच्या विचाराधीन आहे. आताचे ओढावलेल्या संकटात वर्षाला दिल्या जाणाऱ्या सहा हजार रुपयांमधून शेतकऱ्यांना तितकासा फायदा होत नसल्याचे स्वामीनाथ फाऊंडेशनने म्हटले आहे.  यामुळे सरकारने यातील रक्कम राशी वाढवावी  आणि शेतकऱ्यांना वर्षाला १५ हजार रुपये द्यावे असे स्वामीनाथन फाऊंडेशनकडून सांगण्यात आले आहे. दर स्वामीनाथन फाऊंडेशनने यासंदर्भातील प्रस्ताव तयार केला असून हा प्रस्ताव सरकारपुढे मांडला जाणार आहे. हा प्रस्ताव मंजूर झाला तर शेतकऱ्यांना दोन हजारांच्या हप्त्याऐवजी ५००० रुपयांच्या हप्ता मिळेल.

दरम्यान पीएम किसान २०२० च्या लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. पीएम किसान सन्मान निधीची यादी आपण ऑनलाईनही पाहू शकता. pmkisan.gov.in संकेतस्थळावरती जाऊन आपण यादी पाहु शकता.  

पीएम - किसान योजनेसाठी कोणते कागदपत्र लागतात

  • आधार कार्ड
  • बँक खाते
  • सातबारा उतारा
  • रहिवाशी प्रमाणपत्र

कसा करणार योजनेसाठी अर्ज - योजनेची नोंदणी करण्यासाठी अनेक पर्याय आहेत. भारत सरकारचे संकेतस्थळ www.pmkisan.gov.in/ वर जाऊन नोंदणी करू शकता.  किंवा https://www.pmkisan.gov.in/RegistrationForm.aspx येथे आपण नोंदणी आणि अर्ज भरून आपली नोंदणी करु शकता.  याशिवाय तुम्ही राज्य सरकार द्वारे नियुक्त करण्यात आलेल्या पीएम - योजनेच्या नोडल अधिकाऱ्यासी संपर्क करु शकता. किंवा आपल्याजवळील सामान्य सेवा केंद्रावर जाऊन आपला अर्ज करू शकता.

English Summary: PM Kisan Scheme: farmer will get 15 thousand rupees per year Published on: 30 April 2020, 05:01 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters