केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी मागील वर्षी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेतून सरकार शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला ६ हजार रुपये देणार आहे. दोन हजार रुपयांच्या हफ्त्याने ही रक्कम दिली जाणार आहे. या योजनेचे दोन टप्पे पार पडले आहेत. या योजनेतून मिळणारे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतात. आपल्या खात्यात जमा होणाऱ्या पैशांची माहिती आपणास व्हावी यासाठी सरकारने ऑनलाईन सेवा प्रदान केली आहे. यातून आपण सर्व माहिती मिळवू शकता.
पंतप्रधान शेतकरी योजनेसाठी कसा कराल नोंदणी /अर्ज
या योजनेसाठी अर्ज करण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. सर्वप्रथम तुम्ही भारत सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर www.pmkisan.gov.in/ जा. आणि पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी या योजनेसाठी स्वत:च्या नावाची नोंदणी करा. https://www.pmkisan.gov.in/RegistrationForm.aspx येथे शेतकऱ्यांची नोंदणी अर्ज भरणे आणि स्वत:ची नोंदणी करावी. याशिवाय शेतकरी महसूल अधिकारी किंवा पंतप्रधान शेतकरी योजनेसाठी राज्य सरकारद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्याकडे संपर्क करु शकता. किंवा आपल्या जवळील सामान्य सेवा केंद्रा (सीएससी)वर जाऊ शकतात. आणि किमान समर्थन योजनेसाठी अर्ज करु शकता.
पंतप्रधान शेतकरी योजनेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे
- आधार कार्ड.
- बँक खाते.
- सातबारा उतारा.
- रहिवाशी दाखला.
नोंदणी झाल्यानंतर www.pmkisan.gov.in/ या लिंकवर जाऊन अर्ज, देयक, आणि इतर तपशीलाची चौकशी करत रहावी.
पंतप्रधान किसान पोर्टलवर किसान कॉर्नर (शेतकरी कॉर्नर) या पर्यायात खालील अजून काही सुविधा आहेत.
- नवीन शेतकरी नोंदणी.
- आधार कार्ड रिकॉर्ड संपादित करा.
- लाभार्थ्यांची स्थिती.
- स्व :नोंदणी/ सीएससीची स्थिती.
- पीएम किसान अॅप डाऊनलोड करा.
पंतप्रधान शेतकरी निधी योजनेची स्थिती आणि लाभार्थ्यांची यादीची चौकशी कशी कराल
- पंतप्रधान शेतकरी योजनेच्या अधिकृत वेबसाईट - www.pmkisan.gov.in/ वर जा.
- मेनू बार वर असलेल्या किसान कॉर्नर (शेतकरी कॉर्नर) वर क्लिक करा.
- आता या लिंकवर क्लिक करा ज्यात लाभार्थींची स्थिती आणि लाभार्थी यादी आहे. त्यात तुम्ही चौकशी करू शकता.
- जर तुम्ही लाभार्थी यादीची चौकशी करत असाल तर तुम्ही आपले राज्य, जिल्हा, उप- जिल्हा, तालुका आणि गावाचे नाव तेथे टाका.
- मग अहवाल मिळवा वर क्लिक करा.
पंतप्रधान शेतकरी योजनेचा लाभार्थींची स्थिती येथे पहा https://bit.ly/2TvLBPi
पंतप्रधान शेतकरी योजनेचे लाभार्थ्यांची यादी येथे पहा https://bit.ly/2TvQYxV
स्वंय नोंदणी सीएससी शेतकरीची स्थिती येथे पहा https://bit.ly/2VSYdBm
काही दिवसांपुर्वी सरकारने शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी एक पंतप्रधान शेतकरी मोबाईल अॅप लॉन्च केले होते. यात सर्व सुविधा उपलब्ध आहेत. कोणत्याही प्रकारच्या समसा आल्यास शेतकरी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. पंतप्रधान शेतकरी हेल्पलाईन नंबर 155261/1800115526 (टोल-फ्री), 011-23381092
Share your comments