शेतीतील पिकांचे नैसर्गिक आपत्तीपासून आर्थिक संरक्षण व्हावे म्हणून केंद्र सरकारने ही पंतप्रधान पीक विमा योजना २०१६ साली सुरू केली. दरम्यान काही राज्यांनी ही योजना बंद केली आहे. परंतु महाराष्ट्र राज्य सरकारने ही योजना २०२३ पर्यंत वाढवली आहे. दरम्यान कोणत्या जिल्ह्यात कोणत्या संस्था पीक विमा पुरवितात याची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.
Prime Minister's Crop Insurance Scheme ची वैशिष्ट्ये.
१) नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या अकल्पित परिस्थतीमुळे पिकांचे नुकसान झल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे.
२) पीक नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे.
३) शेततकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान वापरास प्रोत्साहन देणे.
४ ) कृषी क्षेत्राच्या पतपुरवठ्यात सात्यत्य राखणे.
पंतप्रधान पीक विमा योजनेत कोणत्या गोष्टींसाठी संरक्षण देण्यात आले आहे ?
खरीप हंगामाकरीता
१) हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान.
२) पिकांच्या हंगामातील हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे होणारे नुकसान.
३) पिकाच्या लावणीपासून काढणी पर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ पूर, क्षेत्र क्षेत्र जलमय होणे, भूस्सखलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीडरोग यामुळे येणारी उत्पन्नात घट.
४) स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे पिकाचे नुकसान.
५) नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे पिकाचे काढणीपश्चात नुकसान.
रब्बी हंगामाकरिता
१) हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान.
२) पिकांच्या हंगामातील हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे होणारे नुकसान.
३) पिकाच्या लावणीपासून काढणी पर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ पूर,क्षेत्र क्षेत्र जलमय होणे, भूस्सखलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड रोग यामुळे येणारी उत्पन्नात घट.
४) स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे पिकाचे नुकसान.
५) नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे पिकाचे काढणीपश्चात नुकसान.
कोणत्या जिल्ह्यात कोणत्या संस्था पुरवितात विमा
१) अहमदनगर, नाशिक, चंद्रपूर : भारती एक्सा जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड
२) सोलापूर, जळगाव, सातारा : भारती एक्सा जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड
३) परभणी, वर्धा, नागपूर : रिलायन्स जनरल इन्शुरन्स कपंनी लिमिटेड.
४) जालना, गोंदिया, कोल्हापूर : र रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपणी लिमिटेड
५) नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग : इफको टोकियोजनर्सल जनरल इन्शुरन्स कंपणी लिमिटेड.
६) औरंगाबाद, भंडारा, पालघर, रायगड : एचडीफसी एर्गो इन्शुरन्स कंपनी लिमिटेड
७) वाशीम, बुलढाणा, सांगली, नंदुरबार : रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड
८) हिंगोली, अकोला, धुळे,पुणे : एचडीफसी एर्गो इन्शुरन्स कंपनी लिमिटेड.
९) यवतमाळ, अमरावती, गडचिरोली : इफको टोकियो जनरल इन्शुरन्स लिमिटेड.
Share your comments