1. इतर

पीएम आवास योजना - विना आधार यादीत बघा आपले नाव; जाणून घ्या पद्धत

सर्वसामन्य आणि मध्यमवर्गीयांना आपल्या हक्काचे घर भेटावे. यासाठी मोदी सरकारने पीएम आवास योजना सुरु केली. प्रधानमंत्री  आवास योजनेच्या अंतर्गत होम लोनवरती क्रेडिट लिंक्ड सब्सिडी दिली जाते. दरम्यान या योजनेच्या अंतर्गत  कोट्यवधी लोकांनी लाभ घेतला आहे. या योजनेच्या अंतर्गत शहरी आणि ग्रामीण भागासाठी  यादी तयार केली डजाते. या यादीत नाव असल्यास संबंधित व्यक्ती या योजनेच्या लाभ घेण्यास पात्र असते.  दरम्यान  लाभार्थ्यांच्या मनात नेहमी एक प्रश्न येत असतो, तो म्हणजे या यादीत आपले नाव कसे पाहावे. आधार कार्डशिवाय आपले नाव या यादीत तपासता येते का असा प्रश्न आपल्याला असेल तर याचे उत्तर आमच्याकडे आहे. जर आपल्याला यादीत नाव पाहायचे असेल तर यासाठी आपल्याला या योजनेच्या लिंकवर जावे लागेल.

प्रधानमंत्री आवास योजना शहरी यादीमध्ये आपण आपले नाव तपासू शकतात. यासाठी  जर आपल्याकडे स्टेटस तपासण्यासाठी  आधार नंबर नाही तर तुम्ही यादीत व्यक्तिगत माहिती टाकू शकतात. यात मोबाईल नंबर किंवा  असेस्मेंट आयडीसह सर्वजण याची माहिती घेऊ शकतात.  यासाठी आपण या संकेतस्थळावर जा. https://pmaymis.gov.in/Trac_Application_Status.aspx यावर क्लिक करावे लागेल. आणि आपली व्यक्तीगत माहिती त्यात भरावी लागेल. त्यानंतर आपल्या समोर डिटेल संपुर्ण माहिती येईल. ही माहिती आपण सोप्या पद्धतीने आणि विना आधार नंबरच्या मदतीने जाणून घेऊ शकतात.

दरम्यान आपण या योजनेसाठी ऑनलाईन अर्जही करु शकतात. आता पण जाणून घेऊ ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा भरायाचा. ऑनलाईन करताना अनेक प्रकारच्या चुका आपल्याकडून होत असतात.  यासाठी या योजनेत ऑनलाईन अर्ज करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे याची माहिती आपण या लेखातून घेणार आहोत. जेणेकरून अर्ज भरताना आपल्याकडून काही चुका होऊ नयेत.

 

  • सर्वात आधी पीएम आवास योजनाच्या अधिकृत संकेतस्थळ http://pmaymis.gov.in  ओपन करावी.
  • होमपेजवर citizen Assessment मध्ये असलेल्या Benfits under other 3 componenets  वर क्लिक करावे.
  • check Aadhar /VID No. Existence  या शीर्षकाचे नवे पेज ओपन होईल. तेथे आधार नंबरची नोंदणी करा.  त्यानंतर check बटन दाबा.
  • त्यानंतर तुम्ही  एप्लीकेशन फॉर्म म्हणजे ऑनलाईन फार्मवर रिडायरेक्ट केले जाईल.
  • आपल्या समोर एक अर्ज ओपन होईल, त्यात आवश्यक असलेली माहिती काळजीपूर्वक भरा.  लाभार्भीचे नावमोबाईलनंबरईमेलसर्व वैयक्तिक माहितीइनकम स्टेटमेंटबँक खात्याची माहिती आदी गोष्टी यात विचारल्या जातील.

आता कॅप्चा कोड नोंदवा, आणि सेव्ह वर क्लिक करुन  फाईल सेव्ह कराआपल्या आवश्यक असल्याच प्रिंट आऊटही घेऊ शकतात.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters