1. इतर

आता मोफत नाही मिळणार आधार ; अपडेटसाठी लागतील इतके रुपये

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


आधार कार्डही प्रत्येक भारतीयांसाठी आवश्यक आहे. कोणत्याही शासकीय कामांसाठी आधार कार्ड गरजेचे असते. दरम्यान UIDAI ने मात्र आपल्या नियमात बदल केल्याने आपल्याला खर्च येणार आहे. आपल्याला आधार कार्डवरील काही अपडेट करायचे असेल तर त्यासाठी शुल्क आकारले जाणार आहे. 

UIDAI ने काही दिवसापुर्वीच आधार कार्डवरील मोबाईल नंबर, ई-मेल आयडी अपडेट करण्याची प्रक्रिया सोपी केली आहे. यात आता परत UIDAI ने एक बदल केला आहे यामुळे आपल्याला खिशाला झळ लागणार आहे. आधारवरील कोणत्याही अपडेटसाठी १०० रुपयांचे शुल्क आकारले जाणार असल्याची माहिती UIDAI ने ट्विटरवरुन दिली आहे. आधार कार्डवरील एक अपडेट करायची असेल किंवा अनेक, बायोमेट्रिक्ससाठी आपल्याला शंभर रुपये खर्च करावे लागणार आहेत. जर फक्त डेमोग्राफिक डिटेल मध्ये बदल करत असाल तर आपल्याला ५० रुपये द्यावे लागतील.

आधार कार्डसाठी लागणारी कागदपत्रे

UIDAI ने  आधार अपडेट करण्यासाठी कोणते कागदपत्रे लागतील याची माहिती दिली आहे. UIDAI ने सांगितले आहे की,  आपल्या आधार मध्ये नाव, पत्ता, किंवा जन्म तारीख अपडेट करायचा असेल तर पुरविण्यात आलेली कागदपत्रांमध्ये आपले नाव, पत्ता, हे बरोबर आहे ना हे तपासून घेणे. दरम्यान UIDAI ने ३२  कागदपत्रांची यादी दिली आहे. हे ओळखीसाठी मंजुरी देण्यात आली आहे. यातील कोणतेही कागदपत्र अपडेटसाठी उपयोगात येऊ शकतील.

दरम्यान UIDAI ने याआधी सांगितले होते की, फोटोग्राफ, बायोमेट्रिक्स, लिंग, मोबाईल, नंबर, आणि ईमेल आयडीच्या अपडेटसाठी कोणतेही कागदपत्र लागणार नाही. यासाठी आपण आपल्या जवळील आधार केंद्रावर जावे लागेल, त्यासाठी आपण भेटीची वेळ ठरु शकतात.

Like this article?

Hey! I am भरत भास्कर जाधव. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters