केंद्र सरकारने भारतातील तमाम गरीब जनतेसाठी उज्वला गॅस योजना अमलात आणल्या पासून देशात गॅस सिलेंडरचा वापर तळा-गळात, डोंगराळ भागात, आदिवासीबहुल भागात देखील बघायला मिळत आहे. आतापर्यंत घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांना गॅस एजन्सीचे उंबरठे झिजवावे लागत होते. प्रत्येक वेळी गॅस रिफिल करण्यासाठी गॅस एजन्सी गाठावी लागत होती. केंद्र सरकारने आता एक नवीन योजना अमलात आणली असल्याचे समजत आहे, केंद्र सरकारच्या या नवीन योजनेद्वारे आता गॅस सिलेंडरसाठी गॅस एजन्सीचे उंबरठे झिजवण्याची आवश्यकता भासणार नाही.
रेशन दुकानात सुद्धा आता गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्याची केंद्र सरकारची योजना असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे गॅस वापर करणाऱ्यांना सुविधा होणार असल्याचे सांगितले जात आहे. देशातील सर्व स्वस्त धान्य दुकानात यापुढे छोटे घरगुती गॅस सिलेंडर उपलब्ध होणार असल्याची माहिती समोर येत आहे. जर केंद्र सरकारची ही योजना अमलात आणली गेली तर यामुळे जनतेची नाहक होणारी पायपीट कमी होईल, आणि यामुळे जनतेला मोठी सुविधा उपलब्ध होणार असल्याचे सांगितले जात आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, नुकतेच या संदर्भात एक महत्वपूर्ण बैठक केंद्र आणि राज्यात पार पडली आहे. केंद्रातील वेगवेगळ्या विभागातील मंत्रालयाचे प्रतिनिधी देखील बैठकीत उपस्थित होते. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, केंद्र सरकारच्या या निर्णयाला देशातील तमाम पेट्रोलियम कंपन्यांनी पाठिंबा दर्शविला आहे.
पेट्रोलियम कंपन्यांच्या मते, केंद्र सरकार तसेच राज्य सरकारांना यासंदर्भात समर्थन दिले जाईल. एकीकडे मायबाप सरकार नागरिकांच्या सुविधेसाठी स्वस्त धान्य दुकानात गॅस सिलेंडर उपलब्ध करून देत आहे तर दुसरीकडे आगामी काही दिवसात गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठी वाढ होणार असल्याचे सूत्राद्वारे सांगितले जात आहे. प्रसारमाध्यमांनुसार, एलपीजी सबसिडीमुळे होणारा तोटा हा जवळपास शंभर रुपयांच्या घरात पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत एलपीजीच्या किमतीत भरमसाठ वाढ झाल्याने हा एवढा मोठा तोटा येत असल्याचे सांगितले जात आहे. एलपीजीचे दर ऑक्टोबर महिन्यात 15 रुपये प्रति सिलेंडर एवढे वाढविण्यात आले होते.
जुलै पासून ते आत्तापर्यंत सुमारे नव्वद रुपयांपर्यंत घसघशीत वाढ एलपीजी सिलेंडर मध्ये नमूद करण्यात आली आहे. 14.2 किलो वजनी सिलेंडर आता हजार रुपयांच्या घरात पोहोचला आहे त्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांचे स्वयंपाक घरातील बजेट पूर्णतः कोलमडले असल्याचे सांगितले जात आहे. असे असले तरी, केंद्र सरकारकडे विचाराधीन असलेला स्वस्त धान्य दुकानात छोटे सिलेंडर मिळण्याबाबतचा निर्णय खरंच खूप कौतुकास्पद आहे. यामुळे खेड्या पाड्या वर राहणाऱ्या नागरिकांना मोठा फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून सरकारच्या विचाराधीन असलेल्या निर्णयावर मोठे समाधान व्यक्त केले जात आहे. संदर्भ-मराठीपेपर
Share your comments