एकाच अर्जावर मिळणार विविध योजनांचा लाभ; शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी पोर्टल सुरू

11 July 2020 05:48 PM By: भरत भास्कर जाधव


शासनाकडून शेतकऱ्यांच्या लाभासाठी अनेक योजना राबवल्या जातात. अनेकजणांना या योजनांची माहिती होते, त्यातील काही जण या योजनांचा लाभ देखील घेतात. पण बऱ्याच  शेतकऱ्यांना याची माहिती नसते. यामुळे ते या योजनांचा लाभ घेऊ शकत नाहीत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी पुरविण्यात येणाऱ्या कागदपत्रांची पुर्तता करत करत शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येत असते.   विविध योजनांचा विविध अर्ज असतात असा असंख्य समस्यांमुळे अनेक जण या योजनांपासून दूर राहतात. पण आता तसे होणार नाही.

शेतकऱ्यांना एकाच अर्जावरून विविध योजनांचा लाभ मिळेल, यासाठी सरकारने महाडीबीटी पोर्टल सुरू केले आहे. यामुळे  महाडीबीटी पोर्टलमुळे शेतकऱ्याला माहिती तंत्रज्ञानाची साथ मिळाली आहे. कोरोनासारख्या महामारीच्या काळात देखील सगळे वर्क फ्रॉम होम करत असताना शेतकरी मात्र शेतात राबून संपूर्ण जगाला अन्नधान्य पुरवतो. या अन्नदात्याला अधिक बळ देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. कृषी संजीवनी सप्ताहाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या हस्ते व कृषीमंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीत महाडीबीटी पोर्टलचा शुभारंभ करण्यात आला.  सरकारी योजनांची माहिती या पोर्टलद्वारे शेतकऱ्यांना मिळणार आहे. एकाच ठिकाणी सर्व माहिती मिळणार असल्याने शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

नोंदणी कुठे कराल -

शासनाच्या विविध योजनांसाठी शेतकरी बंधूना आता या पोर्टलवरील लिंकवर जाऊन नोंदणी करता येणार आहे. – https://mahadbtmahait.gov.in/Farmer/RegistrationLogin/RegistrationLogin   शेतीक्षेत्रातही बाजारपेठ संशोधन महत्वाचे आहे त्यामुळे जे विकेल तेच पिकेल या पद्धतीने पिकांचे नियोजन करून राज्यभरातील शेतकऱ्यांना एका छताखाली आणा. यासाठी विभागवार पद्धतीने पिकांचे नियोजन करा, अशा सूचना यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिल्या.

farmer government schemes महाडीबीटी पोर्टल mhadbt portal government scheme राज्य सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्य कृषी मंत्री दादाजी भुसे state agriculture minister dadaji bhuse cm udhav thackarey
English Summary: Now farmer get benefit of all government schemes from on one application

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.