1. इतर

नाबार्डच्या मदतीने सुरू करा दूध डेअरी; अन् कर्जावर मिळवा ३३ टक्क्यांची सब्सिडी

KJ Staff
KJ Staff


गावात शेती व्यवसायासह पशुपालन मोठ्या प्रमाणात केले जाते.  पशुपालनाने आपले उत्पन्न दुप्पट होण्यास मदत मिळत असते. पशुपालनातून आपण शेण- सेंद्रिय खत तर मिळवत असतो. याचबरोबर जर आपल्याकडे दुधाळ जनावरे असली तर फायदा अधिक होत असतो. दुग्धव्यवसाय आपण करु शकतो. या व्यवसायात आपण काही भांडवल गुंतवले तर आपण छान पद्धतीने डेअरी व्यवसाय सुरू करु शकतो. जर तुमच्याकडे १० गायी किंवा म्हैशी असतील तर तुम्ही डेअरी सुरू करू शकता. आता तुम्ही म्हणाल की, डेअरी सुरू करण्याइतका पैसा आमच्याकडे नाही, मग आम्ही कशी डेअरी सुरू करणार. हा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल तर काळजी करु नका. या प्रश्नाचे उत्तर आमच्याकडे आहे.  डेअरी चालू करण्यासाठी सरकार तुम्हाला नाबार्डच्या मदतीने आर्थिक साहाय्य करते.  ग्रामिण भागातील युवकांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळावा,  यासाठी सरकार प्रयत्नशील असून  याच प्रयत्नातून सरकार विविध योजना आखत असते.

यातील एक भाग म्हणजे डेअरी व्यवसाय. केंद्र सरकारने डेअरी उद्यमिता विकास योजना सुरू केली आहे. डेअरीचा व्यवसाय करायचा आहे,  त्यांना २५ ते ३३ टक्के सब्सिडी देण्यात येते. दहा जनावरांसाठी केंद्र सरकार साधारण ७ लाख रुपयांची आर्थिक मदत देते. यात तुम्हाला साधारण १.७ लाख रुपयांची सब्सिडीही मिळत असते. या दहा जनावरांमध्ये प्रामुख्याने सिंधी, गीर, शाहीवाल, या गायीचा समावेश केला जातो.  नाबार्ड पशुखाद्यसाठी पण अनुदान देत असते.  साधारण आपल्यालाकडे २० गायी म्हैशींच्या युनिटची डेअरी असेलत तर नाबार्ड ५ लाख ३० रुपयाचे अनुदान देते.   दरम्यान नाबार्डशी संबंधित सहकारी बँक, शहरी आणि ग्रामिण बँक, राज्य सहकारी बँकांकडूनही आपल्याला अनुदान मिळते. हा व्यवसाय कोणीही सुरू करु शकतो. या योजनेची विशेषता म्हणजे तुम्ही दोन जनावरांच्या युनिटची डेअरी पण सुरू करू शकता. यासाठी साधारण ३५ हजार रुपयांचे अनुदान मिळते.


डेअरी उद्यमिता विकास योजनेचा हेतू (Objective of 'Dairy Entrepreneurship Development Scheme')
स्वच्छ दूध उत्पादनासाठी आधुनिक डेअरी युनिटची स्थापनेसाठी प्रोत्साहन देणे.
व्यावसायिक हेतूने दूध संकलन आणि गुणवत्ता आणि पारंपारिक पद्धतीत सुधारणा.
असंघटित क्षेत्रात संरचानात्क परिवर्तन करण्यास सुरुवातीला दुग्ध प्रसंस्करण ग्रामिण पातळीवर आणण्यासाठी.
स्वरोजगार उत्पन्न करणे आणि मुख्यत असंघटित क्षेत्र मजबूत करणे.
DEDS योजना के तहत लोन देने वाले वित्तीय संस्थान (Lending Institutions under DEDS Scheme)

योजनेच्या अंतर्गत कर्ज देणाऱ्या बँका कोणत्या

वाणिज्यिक बैंक वाणिज्य बँक , कमर्शिअल बँक
राज्य सहकारी बँक
राज्य सहकारी आणि ग्रामिण विकास बँक
नाबार्डशी संबंधित इतर संस्था

डीईडीएस च्या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
जर आपल्याला १ लाख पेक्षा जास्त रुपयांचे कर्ज घ्यायचे असेलत तर आपल्याला जमिनीशी संबंधित कागदपत्रे तारण ठेवावे लागतात.
जातीचा दाखला, जात प्रमाणपत्र
ओळखपत्र आणि प्रमाणपत्र
आपल्या व्यवसायाच्या प्लानची प्रत
पशुपालन करणारे https://www.nabard.org/auth/writereaddata/File/Annexure_1.pdf या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही अर्ज मिळू शकता.
नाबार्डच्या संकेतस्थळावर जाऊन करा अर्ज
नाबार्डच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही या योजनेचा अर्ज भरु शकता. www.nabard.org
पुढील पद्धतीने करता येईल अर्ज
नाबार्डच्या साईटवर गेल्यानंतर होमपेज ओपन होईल.
होमपेज ओपन झाल्यानंतर Dairy Entrepreneurship Development Scheme यावर क्लिक करा. माहिती जाणीवपुर्वक वाचा. त्यानंतर तुम्ही अर्ज डाऊनलोड करा.
अधिक माहितीसाठी http://dadf.gov.in/deds या संकेतस्थळावर जा.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters