पीएम किसान योजनेचा आठवा हप्ता मोदी आज जाहीर करणार

13 May 2021 10:13 PM By: KJ Maharashtra
पीएम किसान योजनेचा आठवा हप्ता मोदी आज जाहीर करणार

पीएम किसान योजनेचा आठवा हप्ता मोदी आज जाहीर करणार

 केंद्र सरकारचे महत्वकांशी योजना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेद्वारे वार्षिक सहा हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जातात हे सहा हजार रुपये दोन हजार रुपये याप्रमाणे तीन समान हप्त्यांमध विभागून दिले जातात त्याच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी 11 वाजता पंतप्रधान मोदी हे दोन हजार रुपयांचा आठवा हप्ता  जाहीर करणा आहेत. पंतप्रधान मोदी हे आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे शेतकऱ्याचे संवाद साधतील अशा प्रकारची माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे.

या योजनेअंतर्गत आज  9.5 कोटी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात 19 हजार कोटींपेक्षा जास्त रुपये ट्रान्सफर करण्यात येणार आहेत.या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीत पंतप्रधानांसह केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर देखील सहभागी होणार आहेत. पी एम किसान सन्मान योजना ही 2019 मध्ये अंतरिम बजेट मध्ये जाहीर करण्यात आली असून डिसेंबर 2018 पासून अमलात आली होती.

 हेही वाचा : जाणून घ्या पीएम किसान योजनेचा पैसा तुम्हाला मिळणार की नाही?

यादी मध्ये आपले नाव कसे चेक करावे

 जर आपण या योजनेसाठी नोंदणी केली असेल तर पंतप्रधान किसान पोर्टल वर म्हणजेच pmkisaan.gov.in या संकेत स्थळावर जाऊन आपले नाव तपासू शकता. ते कसे तपासावे हे पाहू.

  • सर्वप्रथम पंतप्रधान किसान च्या अधिकृत वेबसाईट ला https://pmkisaan.gov.in भेट द्या.

  • वेबसाईट उघडल्यानंतर मेनू बार मधील फार्मर कॉर्नर वर  क्लिक करा.

  • यानंतर आपले राज्य, जिल्हा, गट आणि गावाची माहिती प्रविष्ट करा

  • यानंतर आपल्याला गेट रिपोर्ट या पर्यायावर क्लिक करावे लागेल. या अहवालात आपल्या गावातील सर्व लाभार्थ्यांची माहिती मिळेल.

  • या यादीमध्ये आपले नाव तपासू शकता.

यादीमध्ये नाव नसल्यास तक्रार कोठे नोंदवावी.

 जर आपण नोंदणी केली असेल आणि आपले नाव लाभार्थ्यांच्या यादी मध्ये नसेल तर आपण पी एम किसान या वेबसाईटवर हेल्पलाइन नंबर वर तक्रार नोंदवू शकता.

  • पी एम किसान हेल्पलाइन -155261

  • पंतप्रधान किसान टोल फ्री-1800115526

  • पंतप्रधान किसान लँड लाईन क्रमांक-011-23381092,23382401

  • ई-मेल आयडी -pmkisaan-ict@gov.in वर ईमेल द्वारे तक्रार देखील केली जाऊ शकते

   

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी पंतप्रधान मोदी केंद्र सरकार central government pradhanmantri kisan samman nidhi primeminiter
English Summary: Modi will announce the eighth installment of PM Kisan Yojana today

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.