आयुष्यमान कार्ड विनामूल्य बनवा, उपचारासाठी मिळवा पाच लाख

22 April 2021 11:45 PM By: KJ Maharashtra
आयुष्यमान कार्ड

आयुष्यमान कार्ड

देशातील सर्वसामान्य गरीब जनतेला दवाखान्यात उपचारासाठीखर्च करण्यासाठी अडचणी येऊ नयेत म्हणून केंद्र सरकारने आयुष्यमान भारत योजना सुरू केली.  या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना पाच लाखापर्यंतचे आर्थिक मदत दिली जाते. हे कार्ड तयार करण्यासाठी अगोदर तीस रुपये शुल्क भरावे लागत होते.  परंतु आता कोरोना काळामध्ये सरकारने या मध्ये दिलासादायक निर्णय घेतला की आता कोणताही व्यक्ती आयुष्यमान भारत कार्डविनामूल्य मिळू शकते आणि उपचारासाठी आर्थिक लाभ देऊ शकता.

 हे कार्ड कसे बनवावे?

 आयुष्यमान भारत कार्ड बनवण्यासाठी तुम्ही शासकीय आरोग्य केंद्राशी संपर्क साधू शकता किंवा योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करू शकता. एकदा तुमची नोंदणी झाली तर मोहिमेची संबंधित कर्मचारी आपल्या घरी येतील आणि संपूर्ण तपशील घेतील.  हे कार्ड एटीएम कार्ड सारखी दिसते,, तसेच ते खराब होत नाही. आता ते कार्ड विनामूल्य दिले जाईल.

 

30 एप्रिल पर्यंत विनामूल्य आयुष्यमान  कार्ड बनवण्याची मुभा

 आयुष्यमान कार्ड फ्री बनवण्यासाठी सरकारकडून एक विशेष मोहीम राबवली जाते.  त्या मोहिमेअंतर्गत 30 एप्रिल पर्यंत तुम्ही या या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. या कार्डच्या माध्यमातून पाच लाखांपर्यंतची वैद्यकीय सुविधा मिळण्याची तरतूद आहे.  हे कार्ड गोल्डन कार्ड म्हणून देखील ओळखली जातेआयुष्यमान भारत योजना अंतर्गत कार्डधारकांना त्यांच्या आजारावर सरकारी रुग्णालयात उपचार करता येतात.  

या माध्यमातून त्यांना उपचारासाठी विमा चे पैसे मिळू शकतील. या कार्डच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला उपचारासाठी पाच लाख रुपये दिले जातात.

Ayushman Bharat treatment आयुष्यमान कार्ड उपचार केंद्र सरकार central government
English Summary: Make ayushman bharat card without cost, get five lakh for treatment

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.