'या' योजनेतून अनुदान मिळवण्यासाठी राज्यभरातून अर्जांचा पाऊस

07 January 2021 12:21 PM By: KJ Maharashtra
माननीय बाळासाहेब कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पातून अनुदानासाठी  अर्ज

माननीय बाळासाहेब कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पातून अनुदानासाठी अर्ज

माननीय बाळासाहेब कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पातून अनुदानासाठी राज्यातून अर्जांचा पाऊस पडला आहे. दरम्यान नियोजनाप्रमाणे अर्ज स्वीकारणी आटोपली आहेत, आता मुदतवाढ दिली जाणार नाही, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. राज्यातील समुदाय आधारित संस्था आणि संस्थात्मक खरेदीदार अशा दोन वर्गांना  http://www.smart-mh.org या संकेतस्थळावर नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन दिली गेली होती.

संकेतस्थळावर शेवटच्या दिवसापर्यंत पाच हजार ७०९ इतके विक्रमी अर्ज संस्थांकडून दाखल करण्यात आले आहेत.राज्यातील आत्मा नोंदणीकृत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांनी कृषी खात्याच्या स्मार्ट प्रकल्पातून अुनदानासाठी अर्ज सादर केले आहेत. याशिवाय महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील संघ आणि महिला आर्थिक विकास महामंडळाने स्थापन केलेल्या केंद्रांना अर्जासाठी मुभा देण्यात आली होती. या अर्जांची छाननी केली जाईल.

हेही वाचा : अनुसूचित जमातींना कृषी विकास योजनांसाठी 50 कोटींचा निधी

स्मार्ट प्रकल्पातून राज्य व राज्याबाहेर कार्पेरेट्स प्रक्रियादार, निर्यातदार, लघुउद्योजक, स्टार्ट्स अप तसेच कोणत्याही खरेदीदाराला देखील अर्जाची संधी १५ डिसेंबरपर्यंत दिली गेली होती. 

अर्जांना मोठा प्रतिसाद मिळाल्याने ही मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली होती. कृषी खात्याने अर्ज छाननीसाठी आता मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत. या मार्गदर्शक सूचना व नियमावली क्षेत्रीय यंत्रणांना दिली जाणार आहे.

applications माननीय बाळासाहेब कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प Hon'ble Balasaheb Agribusiness and Rural Transformation Project अर्ज
English Summary: lots of applications from all over the state to get grants from this scheme

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय









CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.