पंतप्रधान जन धन योजनेला सहा वर्ष पूर्ण झाली आहेत. या सहा वर्षात ४० कोटी बँक खाती या योजनेच्या अंतर्गत उघडण्यात आली आहेत. सरकारने या योजननेतील खातेधारकांना अनेक योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. कोरोनाच्या काळात जन धन खातेधारक महिलांना मोदी सरकारने तीन महिन्यासाठी ५०० रुपयांची आर्थिक मदत थेट महिलांच्या खात्यात हस्तांतरण केले होते. दरम्यान या योजनेला सहा वर्ष पूर्ण झाले असून सरकारने जन धन खातेधारकांना अजून दोन योजनांचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना (PMSBY) या योजनेच्या अंतर्गत जन धन खातेधारकांना समावून घेतले जाणार आहेत.
अर्थ मंत्रालयानुसार, जन धन योजनेमध्ये योग्य खातेधारकांना जीवन ज्योति विमा योजना आणि सुरक्षा विमा योजनेची सुविधा पुरविण्यात येणार आहे. जीवन ज्योति विमा योजनानुसार, १८ ते ५० वर्षाच्या बँक खातेधारकांना एका वर्षासाठी फक्त ३३० रुपयांचा हप्ता भरावा लागणार आहे. यानुसार २ लाख रुपयांपर्यंतचा जीवन विमा सुरक्षा दिली जाणार आहे.
दरम्यान यात जर खातेधारकांचा मृत्यू झाला तर ही रक्कम त्यांच्या नातेवाईकांना, कुटुंबियांना दिली जाते. हप्त्याची रक्कम ही थेट लाभार्थ्याच्या खात्यातून कपात केली जाते. सुरक्षा विमा योजना १८-७० वर्षाच्या वयाच्या खातेधारकांसाठी आहे. यानुसार, १२ रुपयांचा हप्ता असून एका वर्षासाठी २ लाख रुपयांचा अपघाती मृत्यू विमा दिला जातो. किंवा अपघातात अपंगत्व आल्यास एक लाख रुपयांचा दिव्यांगता विमा दिला जातो. दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळात म्हणजेच २०१४ मध्ये या योजनेचा शुभारंभ केला होता. ही योजना मोदी सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून लोकप्रिय झाल्याची दिसून येत आहे. या योजनेचा उद्देश हा प्रत्येक नागरिकांला बँकिंग सेवेत आणणे हा होता.
या योजनेनच्या लाभार्थींमध्ये ६३ टक्के लोक ग्रामीण भागातील आहेत. त्यात महिलांचे प्रमाण ५५ टक्के आहे. लाभार्थींना सरकारतर्फे मिळणारी मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करणे या योजनेमुळे शक्य झाले आहे. जनधन खात्यातून इतर सुविधा मिळण्यासह आपल्याला खाते उडल्यानंतर ३० हजार रुपयांचा बिमा देखील मिळतो. यासह २ लाख रुपयांच्या अपघाती विम्यातील डेथ कव्हर विमा आणि ५ हजार रुपयांचा ओवरड्राफ्टची सुविधाही मिळते, जी इतर बचत खात्यांमध्ये मिळत नाही. जर आपल्या खात्यात शुन्य रुपये बाकी असेल तरीही आपण ओव्हरड्राफ्टच्या सुविधेतून ५ हजार रुपये काढू शकतात. यासाठी फक्त एक अट आहे, ती म्हणजे जनधन खाते पीएमजेडीवाय, आधारकार्डशी लिंक असावे.
Share your comments