देशात दिवसेंदिवस पेट्रोलच्या किमती आकाशाला गवसणी घालत आहेत. हेच कारण आहे की देशात सर्वत्र, चांगल्या मायलेज देणार्या गाड्यांची मोठी मागणी बघायला मिळत आहे. अनेक लोक आता इलेक्ट्रिक बाईकचा वापर करीत आहेत मात्र असे असले तरी, इलेक्ट्रिक बाईक ची किंमत ही अधिक असल्याने तसेच काही लोकांना अजूनही पेट्रोल बाईक चालवणे पसंत असल्याने मोठ्या प्रमाणात चांगल्या मायलेजवाल्या बाईक्सची विक्री होतं आहे.
देशात बजाज कंपनीची प्लेटिना ही बाईक सर्वात जास्त मायलेज देणार्या गाड्यांच्या यादीतं नेहमीच अव्वल स्थानी येत असते. ही बाईक आपल्या दमदार मायलेजमुळे आणि जानदार लुकमुळे कायमच मध्यमवर्गीय लोकांच्या पसंतीस खरी उतरली आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, बजाज प्लॅटिना या बाइकची एक्स शोरूम किंमत 60 हजारांच्या घरात असते मात्र तीची रोड ऑन प्राईस जवळपास 72 हजाराहून अधिक असते. परंतु आज आम्ही या कंपनीची गाडी कशा पद्धतीने 25 हजारांपर्यंत खरेदी करू शकता याविषयी सांगणार आहोत.
मित्रांनो आपणास बजाज प्लेटिना ही गाडी खरेदी करायचे असेल मात्र नव्याने गाडी खरेदी करण्यासाठी एवढा मोठा पैसा उपलब्ध नसेल तर आपण बजाज प्लेटिना ही बाईक सेकंड हॅन्ड खरेदी करू शकता. आज आम्ही बजाज प्लेटिना सेकंड हॅन्ड गाडी वर सुरू असलेल्या भन्नाट ऑफर विषयी आपणास माहिती देणार आहोत. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया याविषयी.
सेकंड हॅन्ड बजाज प्लॅटिनावर उपलब्ध ऑफर
Bikedekho या साइटवर सेकंड हॅन्ड बजाज प्लेटिना फक्त पंचवीस हजार रुपयात विक्रीसाठी लिस्ट करण्यात आली आहे. ही सेकंड हॅन्ड बजाज प्लेटिना गाडी 2014 मध्ये खरेदी करण्यात आली आहे अर्थात ही गाडी आठ वर्ष वापरलेली आहे.
Bilewale या साइटवर सेकंड हॅन्ड बजाज प्लेटिना गाडी केवळ 15 हजार रुपयात विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे. या साइटवर लिस्ट केलेली गाडी ही 2011 वर्षाची आहे अर्थात या गाडीला 11 वर्षे पूर्ण झाले आहेत.
Share your comments